आष्टीत प्रसिद्ध विधीज्ञ बाळासाहेब मोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
*************************
***************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी न्यायालयातील प्रसिद्ध विधीज्ञ तथा युवा कार्यकर्ते अँड. बाळासाहेब मोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा आज सोमवार दि.१८ ऑगस्ट रोजी आष्टी येथील मोरेश्वर मंगल कार्यालयात होणार आहे तसेच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाभिमुखतेने अँड.मोरे यांचा वाढदिवस साजरा होणार असल्याची माहिती अँड.बाळासाहेब मोरे मित्र मंडळाच्यावतीने दिली आहे.
लोकनेते आ.सुरेश धस यांचे कॉलेज जीवनापासूनचे एकनिष्ठ कार्यकर्ते,आष्टी न्यायालयात प्रसिद्ध विधिज्ञ तथा युवा कार्यकर्ते बाळासाहेब मोरे यांचा व त्यांची कन्या वृंदा हीचा देखील योगायोगने एकाच दिवशी वाढदिवस असल्याने अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात तसेच सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा होणार आहे. वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप, रुग्णांना फळे वाटप, वृक्षारोपण व आष्टी शहरातील मोरेश्वर मंगल कार्यालयात रात्री ७ वा. अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे.
मित्र परिवारांचा मोठा गोतावळा नेहमी सुखदुःखात व अडचणीच्या काळात हाक दिली की धावून जात मदतीचा हात देणारं मित्रत्व जपणार व्यक्तिमत्व म्हणून त्याची एक वेगळी ओळख आहे. सामाजिक,राजकीय,धार्मिक तसेच न्यायालयीन उपक्रमात नेहमी हिरारीने सहभाग त्यांचा पाहायला मिळतो. सामाजिक व समाजाच्या हिताचे प्रश्न आपल्या वकिली क्षेत्रातून मार्गी लावण्यात त्यांचा वेगळाच हातकंठा आहे.आपल्या व्यवसायातून गोरगरिबांचे अनेक प्रश्न मार्गी लावत मदतीची भावना सदैव डोळ्यासमोर ठेऊन ते आपल्या क्षेत्रात काम करत आहेत.
मोठा मित्रपरिवार, समाजाप्रती आदर आणि नेहमी समाजाची सेवा करणे हाच एक उद्देश ठेवून आपल्या कार्यक्षेत्रात अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे हे व्यक्तिमत्व आहे.अँड.बाळासाहेब मोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होणारा असून या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अँड. बाळासाहेब भैय्या मोरे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


stay connected