प्लॉट नावावर न करता महिलेची पाच लाखांची फसवणूक -------------------------------- आष्टी पोलिसात पाच जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल

 प्लॉट नावावर न करता महिलेची पाच लाखांची फसवणूक
--------------------------------
आष्टी पोलिसात पाच जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल 



----------------------------

आष्टी / वार्ताहर 

--------------------

येथील विधवा महिलेच्या कुटुंबाकडून पाच लाख घेऊन प्लॉट नावावर करून देण्याचे ठरवले असताना देखील प्लॉट नावावर केला नाही. मागील आठ वर्षांपासून पैसे परत देण्यास देखील टाळाटाळ होत असल्याने सदरील महिलेच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात १५ ऑगस्ट रोजी पाच जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आष्टी तालुक्यातील कडा येथील सपना विजय तांगडे या महिलेने मयत पति,व इतरांच्या समोर घरापासून जवळच असलेला एक प्लॉट बघितला व त्याचा पाच लाखात व्यवहार ठरला. त्याकरिता जून २०१५ मध्ये रोख एक लाख व आक्टोबर २०१५ मध्ये चार लाख रूपयाचा एसबीआय बँकेचा धनादेश असे एकूण पाच लाख रूपये दिले. परंतु आजपर्यंत सदरील प्लॉट महिलेच्या नावे करण्यात आले नाहीत. प्लॉट नावावर करा, नाहीतर पैसे परत द्या असे वेळोवेळी बोलून देखील प्लॉट परत न देता मानसिक त्रास देऊन फसवणूक केल्याने १५ ऑगस्ट रोजी सपना विजय तांगडे रा. कडा यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र शनतराव धुमाळ, श्रीपाळ शनतराव धुमाळ रा. कडा, श्रीमंत गहिनीनाथ गायकवाड, निलेश दिगंबर होनकसे, सुनील महावीर पंढरे रा. आष्टी ता. आष्टी.जि बीड यांच्यावर कलम ४२० नुसार आष्टी पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आष्टी पोलिसात त्या विधवा महिलेने तक्रार दिल्यानंतर पंचांहत्तर दिवसानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

--------%%%--------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.