अकलूज येथे दळवी परिवार जपताहेत वारसा परंपरेचा

 अकलूज येथे दळवी परिवार जपताहेत वारसा परंपरेचा






 अकलूज प्रतिनिधी -दि29/7/2025 रोजी वार मंगळवार नांगपंचमी सणानिमित्त दळवी परिवाराच्या वतीने सालाबाद प्रमाणे  गुळ शेंगदाणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आजच्या या कार्यक्रमासाठी युवा नेतृत्व चि. सयाजीराजे  संग्रामसिंह मोहिते पाटील उपस्थित होते .नागपंचमी सणानिमित्त पूर्वीच्या काळी कै. सहकार महर्षी शंकरराव नारायणराव मोहिते पाटील उर्फ काकासाहेब जुना बाजारतळ या ठिकाणी आपल्या सवंगडया समवेत सुरपाट खेळत असत व खेळून  झाल्यानंतर  दळवी यांच्या  दुकानामध्ये गुळ शेंगदाण्याचा आस्वाद घेत असत .आज देखील  तीच परंपरा  आदरणीय श्री. जयसिंह शंकरराव मोहिते पाटील उर्फ बाळदादा तसेच श्री. संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील उर्फ आण्णासाहेब व युवानेते चि.सयाजीराजे संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील  यांनी जोपासली आहे . आज  या कार्यक्रमाच्या निमित्ताने युवा नेतृत्व  चि. सयाजीराजे  यांचा सत्कार दळवी  परिवाराच्या वतीने श्री. रणजीत दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी विविध संस्थांचे पदाधिकारी ,   ज्येष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते उपस्थित होते



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.