"कृषीमंत्री कोकाटे यांच्या 'रमी' प्रकरणावर समितीचा अहवाल सादर; रोहित पवारांची सरकारवर टीका"
Vdo पहा📽️👇
देवेंद्र फडणवीस हे अटल बिहारी वाजपेयी यांचा वारसा सांगतात तर दादा हे यशवंतरावांचा वारसा सांगतात मग कारवाई काय रोहित पवारांचा खोचक सवाल
मुंबई – कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सभागृहात रमी खेळल्याच्या प्रकरणात सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सादर करण्यात आला आहे. या अहवालात नेमकं काय निष्कर्ष नोंदवले आहेत, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. "18 ते 22 मिनिटं कृषी मंत्री सभागृहात रमी खेळत होते, असा स्पष्ट व्हिडिओ पुरावा आहे. इतक्या मोठ्या पदावर असलेल्या मंत्र्याकडून हे वर्तन अयोग्य आणि शेतकऱ्यांच्या समस्या दुर्लक्षित करणारे आहे," असे ते म्हणाले.
"अहवाल सरकारकडे आला आहे, मात्र तो जनतेसमोर आणणे आवश्यक आहे," अशी मागणी करत पवार यांनी सरकारच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांना उद्देशून म्हटलं, "अटल बिहारी वाजपेयी किंवा यशवंतराव चव्हाण यांचे विचार आपण मानत असाल, तर आता हा अहवाल आल्यानंतर त्या मंत्र्यांवर तुम्ही काय कारवाई करता, हेच महाराष्ट्र पाहणार आहे."
या प्रकरणात समितीने नेमके काय नमूद केले आहे आणि सरकारची पुढील भूमिका काय असेल, यावरच कोकाटे यांचे मंत्रीपद टिकणार की नाही, हे ठरणार आहे.


stay connected