आहिल्यानगर येथे रिपाई व कुरेशी समाजाचे अजित पवार यांना निवेदन
संपुर्ण महाराष्ट्र राज्यात कुरेशी समाज तसेच शेतकरी व व्यापारी यांच्यावर काही विशिष्ट संघटना मार्फत होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून कुरेशी समाज तसेच शेतकरी व व्यापारी संघटनेने जनावरे खरेदी विक्री करणे बंद केलेली असून सदर प्रकारणामध्ये विशेष लक्ष घालून कुरेशी समाज तसेच शेतकरी व व्यापारी यांना न्याय मिळुन देण्यात यावा असे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अहिल्यानगर येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी देण्यात आले .
आर.पी.आय. (आठवले गट) व संपूर्ण कुरेशी समाज तसेच शेतकरी व व्यापारी संघटना, आष्टी जि.बीड. यांच्यावतीने हे निवेदन सादीकभाई कुरेशी व अशोक साळवे यांनी सजित पवार यांना दिले .
कुरेशी समाजाचा म्हशी (Buffalo), जर्शी व भाकड जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे व सदर व्यवसाय त्यांच्या पूर्वजांपासून चालत आहे व सदर जनावरांची वाहतुक करतांना जनावरांना कोणतेही दुखापत व आजार होऊन नये. तसेच चारा पाण्याची व्यवस्था करून काळजी घेऊन सदर वर्षानुवर्षे चालत आलेला व्यवसाय करतात . व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सुमारे १.५ लाख ते २ लाख व्यक्ती सदर व्यवसाय करत आहे. परंतु महाराष्ट्र राज्य मध्ये गौ-रक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करणे, मारहाण, लुटमारी तसेच जनावरे जप्त करणे व जनावरे घेऊन जाणे इत्यादी प्रकार चालु असल्याने या अत्याचाराला कंटाळून समस्त कुरेशी समाज तसेच शेतकरी व व्यापारी यांनी जनावरे खरेदी विक्री बंद करण्याचे एकमताने ठरविलेले आहे आणि हे लोण आता संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये पोहोचले आहे .
VDO वृत्त पहा👇📽️
तसेच सदर महाराष्ट्र राज्यामध्ये जनावरे खरेदी विक्री बंद राहील्यास सामान्य मानुस शेतकरी व व्यापारी संघटने वर आर्थिक संकट निर्माण झालेले असुन संबंधीत बाजारातून व्यापारी जनावरांची पावती फाडतो त्याचा देखील बाजार समितीवर
परिणाम होत आहे व त्यामधुन शासनाचं देखील आर्थिक नुकसान होत असतांना दिसत आहे.
१. कुरेशी समाज तसेच शेतकरी व व्यापारनिकडुन जनावरांची वाहतुकीवर विशिष्ट संघटनांकडुन होत असलेले दरोडे व लुटमारी तसेच जिवघेण्या हल्लाबाबत कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
२. कायदेशीर मान्यता प्राप्त असेलेल्या जनावरांची खरेदी विक्री करतांना व्यापारी यांचे व्यापाराचे ठिकाणावर खोटे आरोप लावून छापे मारी करून बेकायदेशीर पणे जणावरांची जप्ती थांबवण्यात यावी.
३. जप्त केलेल्या जनावरांची गोशाळा मार्फत काळा बाजारी करून बेकायदेशीरपणे चालत असलेली विक्री पुर्ण थांबविण्यात यावी व मे. कार्टाचे आदेश असतांना जनावरांची सुटका करण्याचे वेळी खंडणीची स्वरुपात मागणी केली जाणारी रक्कमा विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी व जनावरांची सुटका करते वेळी पोलिस संरक्षण देण्यात यावे.
५. कुरेशी समाज अहिल्यानगर जिल्हयातील लोकांची मागिल ३० वर्षा पासुन असलेली मागणी व मंजुर झालेला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ठरावाप्रमाणे कायदेशीर मान्यताप्राप्त कत्तलखाना प्रदान करण्यात यावा.
वरील सर्व बाबींना अनुसरून सदरील मागणीवर योग्य ती कार्यवाही करुन संबंधीत विभागाच्या मंत्री महोदयांची विशेष बैठक घेऊन सदर प्रकरणाची चौकशी करावी व संपुर्ण कुरेशी समाज तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांवर होत असलेले अन्याया विरुध्द विचार विमर्श करून योग्य ते आदेश पारीत करावे. अशा आशयाचे निवेदन अशोक साळवे (तालुका अध्यक्ष, रिपाई.) सादीकभाई कुरेशी (तालुका सल्लागार, रिपाई) ,शाकीर कुरेशी, मोहम्मद कुरेशी, ईरफान कुरेशी, शरीफ कुरेशी, इंतियाज कुरेशी ,अय्याज कुरेशी, राजु सौदागर, शफीक कुरेशी व संपुर्ण कुरेशी समाज तसेच शेतकरी व व्यापारी ता. आष्टी जि. बीड. यांच्या वतीने निवेदनात करण्यात आली .


stay connected