खिडकी तोडून घरात प्रवेश;सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम चोरीला
आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील घटना
आष्टी प्रतिनिधी
रात्रीच्या दरम्यान पाठीमागील बाजूच्या खिडकीचे गज तोडून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केल्याची घटना १५ जुलै च्या रात्री घडली.या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील मच्छिंद्र झगडे हे गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल येथे कामानिमित्त वास्तव्यास आहेत.गावाकडील घर कुलूप बंद असते.कधी कार्यक्रम व कामानिमित्त गेल्यानंतर तिथे राहतात.काही दिवसापुर्वी ते गावी आले होते.याच दरम्यान त्याचे सोने व पैसे घरातील कपाटात विसरून राहिले होते.अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत पाठीमागील खिडकी तोडून आत प्रवेश करून २१ ग्रॅम सोन्याची चैन,साडेसात ग्रॅम पॅन्डल,व रोख १५ हजार रूपये १५ जुलै रोजीच्या रात्री चोरीला गेल्याची घटना घडली.या प्रकरणी
मच्छिंद्र नाथू झगडे रा.देवीनिमगाव ता.आष्टी याच्या फिर्यादीवरून १८ जुलै रोजी अंभोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध कलम ३०५ (अ),३३१ (४) भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
stay connected