खेळातूनच आयुष्याची जडणघडण होते- माजी आ. भीमराव धोंडे
सैराट चित्रपटामुळे आयुष्य बदलले- सैराट फेम सुरेश विश्वकर्मा
राजेंद्र जैन/ कडा
---------------
खेळातूनच आयुष्याची जडणघडण होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी
व्यायाम आणि खेळाला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आ. भीमराव धोंडे यांनी केले तर आपण धोंडे महाविद्यालयात शिकुन याच काॅलेजमुळे माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली, मालिका, चित्रपटात काम करू शकलो ते फक्त याच रंगमंचामुळे असे मत सिनेअभिनेता सुरेश विश्वकर्मा यांनी व्यक्त केले.
कडा येथील बाबाजी संकुलामध्ये माजी आमदार धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१९ ते २१ जुलै अशा तीन दिवसांच्या भव्य क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सिनेअभिनेता सुरेश विश्वकर्मा यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. भीमराव धोंडे होते.
याप्रसंगी व्यासपीठावर अजय धोंडे, अभय धोंडे, गीतकार संजय नवगिरे, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, राजेश धोंडे, भीमराव पाटील, राजाबापु नलावडे, टिव्ही कलाकार सागर पंडागळे, दादा जगताप, उपसभापती नागरगोजे, डॉ. गांजुरे, रिपाईचे अशोक साळवे, हभप पांडुरंग कर्डीले, हरिभाऊ जंजिरे, बजरंग कर्डीले, प्राचार्य डॉ. धोंडे, विठ्ठल लांडगे, सोनाजी गांजुरे, पत्रकार उत्तम बोडखे, गोवर्धन जाधव, शहादेव खेडकर, प्राचार्य डॉ. वाघ, डी.बी. राऊत, प्रा. विधाते, माऊली बोडखे, सागर वाघुले, संदीप ननवरे, प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, प्राचार्य डॉ. अशोक गदादे, डॉ. धोंडे, प्राचार्य काळे, मुख्याध्यापक संजय कोथमिरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
क्रिडा महोत्सवाच्या निमित्ताने प्रारंभी कडा शहरातून ३ हजार ७०० खेळाडूंची भव्य अशी रॅली काढण्यात आली. प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ.विधाते यांनी क्रिडा स्पर्धांचे महत्त्व सांगितले.
पुढे बोलताना माजी आ. धोंडे यांनी सांगितले की, खेळामध्ये हार जित होतच असते. पराभव झाला तरी विद्यार्थ्यांनी कमीपणा समजू नये. सराव करीत रहा. सराव केल्याने यश निश्चित मिळते. खेळामुळे सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. खेळणारा माणूस जीवनात निश्चित यशस्वी होतो. सिनेअभिनेता व सैराट फेम सुरेश विश्वकर्मा यांनी सांगितले की, मी या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे याचा मला खूप अभिमान आहे. आज ज्या स्टेजवरून मी बोलतोय या स्टेजवर मी घडलो, याच ठिकाणी नाटक, एकांकिका केल्या, अभिनय शिकलो, मी विद्यापीठ पातळीवर पोहोचलो. त्यामुळेच माझे भविष्य उज्वल झाले आज याच रंगमंचामुळे मी टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करीत आहे. खेळाडूंनी खूप प्रॅक्टिस करून खेळ खेळावे, मोठे व्हावे यश संपादन करावे आणि आपल्या आई वडिलांचे आणि शाळेचे नावलौकिक करावे. जीवनात शरीर संपत्ती ही महत्त्वाची आहे त्यामुळे खेळाला महत्त्व द्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर खेळाला महत्त्व आहेच. सैराट चित्रपटांमुळे माझे आयुष्य बदलले, त्या चित्रपटामुळेच मी घराघरात आणि लोकांच्या मनामनात पोहोचलो. यावेळी विश्वकर्मा यांनी सैराट चित्रपटातील संवाद ऐकवून विद्यार्थ्यांना खुश केले. गीतकार नवगिरे व इतरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. बापु खैरे व प्रा. शैलजा कुचेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ. भास्कर चव्हाण यांनी मानले.
stay connected