प्रा. जालिंदर चंदनशिव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
आष्टी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील रहिवासी असलेले व धानोरा तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी जनता शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून कार्य करीत असलेले जालिंदर चंदनशिव यांना द युवा ग्रामीण पत्रकार संघाचा मानाचा समजला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष अन्सार शेख यांनी अधिकृत पत्राद्वारे कळवले आहे. दिनांक ३० जुलै रोजी अहिल्यानगर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सांस्कृतिक हॉलमध्ये एका शानदार कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्राध्यापक चंदनशिव यांना प्रदान करण्यात येणार आहे. कष्ट, जिद्द, चिकाटी आणि प्रचंड आत्मविश्वास या सूत्रांचा वापर करत प्राध्यापक चंदनशिव सरांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळाच आकार दिला. सुरुवातीच्या काळामध्ये शाळाविनाअनुदानित तत्त्वावर असताना त्यांना मोठा आर्थिक संघर्ष करावा लागला. शाळेमध्ये काम करत असताना अगदी वृक्षारोपणापासून तर शाळेच्या व्यवस्थापनापर्यंत सर्व घटकांना स्पर्श करून जाणारे त्यांचे कर्तुत्व होते. तसेच आंबेडकरी चळवळीत सक्रिय राहून समाज बांधवांचे नेतृत्व ही सरांनी यशस्वीपणे केले. दुर्दम्य आशावाद व आकाशाला गवसणी घालणारे त्यांचे स्वप्न स्वतःच्या हिमतीवर आणि हातातील मेहनतीवर त्यांनी पूर्ण केले. शाळा सांभाळत असताना विद्यार्थी आणि पालक यांच्याशी त्यांची नाळ
कधी दृढ झाली ते कोणालाच कळाले नाही आणि पाहता पाहता ते एक विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षक झाले. एक प्रतिभा संपन्न शिक्षक, आणि कर्तुत्व संपन्न शेतकरी, तसेच समाज उपयोगी व्यक्तिमत्व म्हणून आजही ते लोकप्रिय आहेत. विद्यार्थी आणि पालक हेच खरे शाळेचे अधिष्ठान आहे असं समजून काम करणार त्यांचं व्यक्तिमत्व जनमानसामध्ये लोकप्रिय आहे. आपली वडीलोपार्जित शेती सांभाळत असताना फळबाग सहित नवनवीन प्रयोग ते नेहमी शेतावर करत असतात त्यामधून त्यांनी फायद्याची शेती करत शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालना सारखे नवीन प्रयोग केले. व प्रगतिशील शेतकरी म्हणून परिसरामध्ये बहुमान पटकावला.
त्यांना सामाजिक कार्याची प्रचंड आवड आहे गोरगरिबांच्या मुलांकरता शैक्षणिक सहकार्य करणे, शालेय साहित्य मुलांना उपलब्ध करून देणे, परिसरातील शाळेला मदत करणे, गोरगरिबांच्या मुलींकरता प्रवास भत्ता देणे, धार्मिक कार्यासाठी मदत करणे, यासारख्या कामामुळे त्यांच्याकडे शैक्षणिक क्षेत्रातील एक आदरणीय, वंदनीय, गुरुवर्य म्हणून पाहिले जाते. या सर्व बाबींचा विचार करून द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेने प्राध्यापक चंदनशिव सर यांना २०२५ चा आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक बौद्धाचार्य वसंतराव बोर्डे गुरुजी तसेच जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्दुल भाई सय्यद, सचिव विजयकुमार बांदल, व्यवस्थापक विशाल भैया बांदल, सेवानिवृत्त प्राचार्य सय्यद वाय. यु, रोडेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गव्हाणे यु. आर., सहशिक्षक प्राध्यापक सय्यदसर, मस्के सर, काकडे सर, खेतमाळ सर, धारक सर, गव्हाणे एस. आर, पठाण सर, श्रीमती बांदल मॅडम, तसेच न्यू इंग्लिश स्कूल पाडळी शाळेचे शिक्षक घनश्याम सातपुते यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
stay connected