सरकारी शाळेंवरचा पालकांचा विश्वास वाढवण्यासाठी शिक्षकांनी आपण ज्या शाळेवर नोकरी करतो, तिथेच स्वतःची मुले शिकवावीत- प्रदिप भैया थोरवे
आष्टी-खुंटेफळ येथील जेष्ठ स्वा.से साहेबरावजी थोरवे दादांनी स्थापन केलेल्या लोकमान्य विद्यालय खुंटेफळ येथील सन १९९१-९२ च्या विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदर प्रसंगी आप प्रदेश संघटनमंत्री प्रदिप थोरवे बोलत असताना त्यांनी सांगितले लोकमान्य विद्यालय या शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी डॉक्टर,इंजिनर,वकील,कलेक्टर, तहसीलदार झाले. मागच्या काळात शिक्षकांची मुलेहीह्याच शाळेत शिकायला असायची त्यांची मुले सुद्धा डॉ. इंजिनर झाली, बाहेरच्या देशांमध्ये जॉब ला गेले. मग आताच अशी काय परिस्थिती निर्माण झाली की जे शिक्षक ज्या शाळेवर नोकरी करतात त्यांचीच मुले त्या शाळेत नसतात. ही परिस्थिती बदलली पाहिजे यासाठी. सरकारी शाळेंवरचा पालकांचा विश्वास वाढवण्यासाठी शिक्षकांनी आपण ज्या शाळेवर नोकरी करतो, तिथेच स्वतःची मुले शिकवावीत असे प्रतिपादन प्रदिप थोरवे यांनी केले.यावेळी सर्व माजी शिक्षक पडवळे सर, वाळके सर, शिंदे सर, रसाळ मॅडम, पवार सर, खलाशे सर, गुरसाले सर, सुभाष थोरवे व माझी विद्यार्थी कृष्णा काकडे, हनुमंत जंजिरे दाजी, परमेश्वर थोरवे, मल्हारी थोरवे, गोवर्धन थोरवे व अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
stay connected