शब्दगंध साहित्यिक परिषद आयोजित 2 रा मध्यवर्ती राज्यस्तरीय साहित्य संवाद आळंदी येथे अध्यक्षपदी राजेंद्र चोभे यांची निवड
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – शब्दगंध च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या दुसऱ्या मध्यवर्ती राज्यस्तरीय साहित्य संवाद च्या अध्यक्षपदी राजेंद्र चोभे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड परिषदे च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आली. चोभे पाटील हे आठवड (ता. नगर, जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी असून, ग्रामीण भागातील साहित्य क्षेत्रात सक्रीय कार्यरत आहेत.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कोहिनूर मंगल कार्यालयात अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.या बैठकीस संस्थापक सुनील गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, राज्य संघटक प्रा.डॉ.अशोक कानडे, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फंड, प्रा.डॉ.अनिल गर्जे, प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर, बबनराव गिरी, स्वाती ठुबे, शर्मिला गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी निवड झाल्या बद्दल त्यांचा शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
राजेंद्र चोभे पाटील यांचे प्राथमिक शिक्षण आठवड येथे झाले असून, माध्यमिक शिक्षण चिचोंडी पाटील येथे पूर्ण झाले आहे.महाविद्यालयीन शिक्षण न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथे घेतल्यानंतर ते राहुरी कृषी विद्यापीठातील कृषी विद्या विभागात कार्यरत आहेत. त्यांनी ‘राष्ट्रसंत तनपुरे बाबा गौरव ग्रंथ’ तसेच ‘वैकुंठवासी विठ्ठल महाराज देशमुख आळंदीकर’ यांचे जीवनचरित्र प्रकाशित केले आहे.विविध वृत्तपत्रांमधून सामाजिक प्रबोधन करणारे लेखन ते सातत्याने करतात.
ते शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थां मध्ये सक्रीय असून, ग्रामीण भागात साहित्य संस्कृती रुजवण्यासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.त्यांच्या या निवडीबद्दल आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, व्याख्याते गणेश शिंदे, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे, अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी यांनी अभिनंदन केले आहे.या बैठकीस मकरंद घोडके, प्रमोद येवले, स्वाती काळे, दिशा गोसावी, रूपचंद शिदोरे, आत्माराम शेवाळे, एम.पी दिवाण, लक्ष्मीकांत तरोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रम व काव्यसंमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी 9921009750 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
stay connected