महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांचा आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे आरोग्य विभागात एचखळबळ..
शासन प्रशासनाच्या वारंवार अन्यायाला कंटाळुन , महाराष्ट्रातील हंगामी फवारणी कर्मचारी यानि घेतला होता आत्मदहनाचा निर्णय
नांदेड :-
राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी एक वेळ समावेशन क्रती समीती च्या वतीने राज्याध्यक्ष मा. श्री.चंद्रकांत वाघमारे कार्याध्यक्ष आनंदराव दुंडे , शिवशंकर टेकाळे यांचे मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्र भर
आत्मदहनाचा इशारा देऊन जिल्हा हिवताप कार्यालयापुढे हंगामी फवारणी कर्मचारी यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला
पण महाराष्ट्र राज्यातील सर्व हंगामी फवारणी कर्मचारी यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी अत्मदहन्याचा इशारा दिल्यामुळे पुलीस बंदोबस्त लावण्यात आला असल्याने, वेळीच बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनि सदरील कर्मचारी पैकि आणेक
तरुणांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिस कर्मचाऱ्यांनी वेळीच अटकाव केल्याने मोठा अनर्थ टळला.
महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांचे वर वेळोवेळी आरोग्य प्रशासनाने अन्याय केला असल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी हे स्वतःच्या जिवाची पर्वा न करता डोक्यावर औषधाचे ओझे एका हातात पिचकारी, बकेट, हातात घेऊन वाडी तांड्यावर, डेंग्यू , मलेरिया, चिकन गुणिया,पुरपरीस्थिती,आशा परीस्थितीत कुठलीच व्यवस्था नसताना वेतनावर काम करनारे कर्मचारी यांची आरोग्य विभागास विसर पडली का काय ?? आसा प्रश्न चंद्रकांत वाघमारे यांनी केला
हंगामी फवारणी कर्मचारी यांचा गट-क (आरोग्य सेवक) या पदाकरीता असलेला ५०% कोटा रद्द करून गट-ड मध्ये घेतला, गट-क मध्ये हंगामी फवारणी कर्मचारी यांना ९० दिवस अनुभव असणे आवश्यक आसे होते, त्यावेळी सहा सात महिने काम चालायचे त्या वेळी९०दिवसाची अट व सध्या स्थित संपुर्ण महाराष्ट्रात हिवताप निर्मुलन झाले असुन एकही दिवसाचे काम काज उपलब्ध नसून १८० दिवस अनिवार्य करण्यात आले हा हेतूपरस्सर कट रचला असल्याचे दिसून येत आहे त्यामुळेच आज महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यानि अत्मदहन्याचा निर्णय घेतला आहे
आरोग्य प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हंगामी फवारणी कर्मचारी यांचे लवकरच प्रशीध्द होणार असलेल्या जाहिरातीमध्ये तात्काळ शूद्धिपत्रक काढून सरळ सेवा परीक्षा पेपर वेगळे व ५०% कोटा मधुन गट-ड परीक्षा देणारे उमेदवार यांचे पेपर वेगळे काढून संचालक सहसंचालक यांनी मान्यता दिलेल्या प्रस्ताव संदर्भ क्र.०४ याप्रमाणे उचित कार्यवाही करून परीक्षा घेण्यात यावी आसे चंद्रकांत वाघमारे यांनी म्हटले आहे व लेखी स्वरूपात मागणी केली आहे त्वरीत शूद्धिपत्रक पारीत करावे अशी मागणी केली असता समंधित कार्यालय अधीक्षकांनी व पोलीस निरीक्षक, यांनी जिल्हा हिवताप अधिकारी मा श्री.आम्रत चव्हाण साहेब यांना कार्यालय बाहेर बोलाऊन चर्चा करुण पोलीस कर्मचारी याचे समवेत चर्चेत
आपण लवकरात लवकर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू व शासन स्तरावर कार्यवाही करुन सदरील कर्मचारी यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन देऊन सदरील कर्मचारी यांना आत्मदहना यापासुन प्रवर्त कले
तेव्हा महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांनी अत्मदहन किंवा अत्मदहन्याचा निर्णय मागे घ्या आसे आव्हान चंद्रकांत वाघमारे, आनंदराव दुंडे,शिवकर टेकाळे, शिवराम राठोड, गुणवंत केंद्रे यांनी केले व आत्मदहन तुर्तास माघे घेतले
stay connected