आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते सलिम हसन कुरेशी यांना राज्यस्तरीय समाज रक्षक पुरस्कार प्रदान
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स मानवाधिकार मिशन महाराष्ट्र यांच्या वतीने आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते सलिम हसन कुरेशी यांना राज्यस्तरीय समाज रक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
सामाजिक कार्यकर्ते सलीम हसन कुरेशी यांच्या अथक परिश्रमाचा, भ्रष्टाचार निर्मूलनाचा, समाजसेवेचा, दृढनिश्चयाचा आणि समर्पित प्रतिभेचा समाजाला फायदा होत आहे. भ्रष्टाचार निर्मूलन आणि अन्यायाविरुद्ध समाजसेवेसाठी ते नेहमीच तयार असतात. त्यांच्या चिकाटीने, नम्रतेने, साधेपणाने, दृढनिश्चयाने आणि उदारतेने समाजात अनुकरणीय व्यक्तिमत्त्वाचे उदाहरण घालून दिले आहे. सलीम कुरेशी यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि कार्याला उजाळा देत समाजरक्षक पुरस्कार देऊन आम्ही तुम्हाला या सन्मानाने सन्मानित करतो आणि हे प्रमाणपत्र आदराने समर्पित करतो. तुम्हाला समाजासाठी खूप काम करण्याची क्षमता आणि निरोगी आणि दीर्घायुष्य देवो. अशा आशयाचे सन्मानपत्रही त्यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईटस् मिशन तर्फे शिर्डी येथे दि . २० जुलै रोजी पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात आले . आष्टी तालुक्यातील मित्र परिवाराने सलीम कुरेशी यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
stay connected