सत्तेचा माज आलेली सत्ताधारी नेते आणि कार्यकर्ते गुंड आहेत तात्काळ मुसक्या आवळा नसता बांगड्या भरा-डॉ.जितीन वंजारे

 *सत्तेचा माज आलेली सत्ताधारी नेते आणि कार्यकर्ते गुंड आहेत तात्काळ मुसक्या आवळा नसता बांगड्या भरा-डॉ.जितीन वंजारे*



     बीड प्रतिनिधी:- काल-परवा एक प्रकरण घडलं विधानभवनामध्ये दोन आमदारांची कार्यकर्ते एकमेकांसमोर लढली भिडली आणि हातपाय तोडफोड व डोके फोडा फोडी झाली. यादरम्यान सत्ताधारी पक्षाने विरोधातील पक्षाच्या आमदाराच्या कार्यकर्त्याला हणून मारून त्यांनाच जेलमध्ये टाकलं, त्या ठिकाणी विरोधातील असणाऱ्या काही प्रतिष्ठित आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जोपर्यंत कार्यकर्त्यांना सोडवत नाही तोपर्यंत तेथेच थांबण्याचा पण केला आणि त्या ठिकाणी पोलिसांची आणि संबंधित प्रतिष्ठित आमदारांच्या बाचाबाच्या त्या ठिकाणी झाल्या परंतु दुसरे आमदार जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्याच कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या आमदाराच्या कार्यकर्त्याला हाणामाऱ्या करूनही त्यांच्यावर लवकर गुन्हा दाखल झाला नव्हता याचाच अर्थ पोलीस प्रशासन शासनाच्या अधीन आहे की काय?असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण होत आहे. जेंव्हा एक प्रतिष्टीत राजकारणी आमदार तिथे गेले तेंव्हा गुन्हा दाखल झाला.हे घडतं की नाही की लगेच लातूर या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार रेस्ट हाऊस मध्ये आले असता सत्ताधारी पक्षाचे कृषिमंत्री प्ले रमी हा ऑनलाईन गेम मोबाईल वरती खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्या ठिकाणी कायदे घडवले जातात, बदललले जातात आणि संविधान अबाधित ठेवण्याचे काम ज्या ठिकाणी केलं जातं, सामान्य जनमानसांच्या प्रश्नांना उत्तर ज्या ठिकाणाहून दिली जातात, लोकप्रतिनिधींना निवडून दिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या सामान्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवायचा सोडून येथील कृषिमंत्री रमी हा पत्त्याचा मोबाईल वरती गेम खेळत होते हे किती लज्जास्पद आहे. एकीकडे शेतकरी हवालदिल आहे पाऊस नाही पाणी नाही कर्जमाफी देत नाहीत आणि ते सोडून कृषिमंत्री प्ले रमी गेम खेळत असतील तर धन्य ते सरकार धन्य ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यांचं बेजबाबदार मंत्रिमंडळ. धिक्कार असो तुमचा.सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या पुत्राला हे सहन झालं नाही म्हणून छावाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय घाडगे पाटील यांनी त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना पत्ते भेट देऊन या कृषी मंत्र्याचा जाहीर निषेध व्यक्त केला. हा मनामध्ये राग ठेवून सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एक नव्हे तर तब्बल 20 ते 30 जणांनी बेदम अशा पद्धतीने घाडगेपाटील यांना व साथीदाराणा बेदम मारलं. यावरून एक प्रश्न निर्माण होत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा माणूस व जे बोलतात तेच करतात असं ज्यांची ओळख आहे असे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या कार्यकर्त्यांनी असं अशोभनीय कार्य करणे म्हणजे लज्जास्पद आहे,20 ते 30 लोकांच्या जमावाने एकट्या माणसाला मारणं तेही वाईट कृत्य केलेल्या आमदाराविषयी बोलल्यामुळे हे कितपत योग्य आहे संबंधित पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन तात्काळ त्यांना योग्य ती कार्यवाहि करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मा. सम्राट डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केली आहे. पोलीस प्रशासनाने हा सगळा तमाशा बघूनही संबंधित आरोपींवरती कार्यवाही तात्काळ का केली नाही? हा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेला प्रश्न आहे मग अशा पद्धतीने सत्ताधारी विरोधात खरं बोललं की तुम्ही हाणामाऱ्या करणार आहात का? तुम्ही कसाही वागलात तरी यावर सामान्य जनतेने बोलायचंच नाही का? शेतकऱ्याचे प्रश्न तुम्ही सभागृहांमध्ये मांडण्याचे ऐवजी प्ले रमेश सारखे गेम खेळून शेतकऱ्यांना उद्धट भाषा वापरणार आहात का? कर्जमाफी द्यायची सोडून प्ले रमी खेळणार आहात का? सत्ताधारी पक्षाचा आरसा हा सामान्य जनता असते त्यांच्या वेळोवेळी झालेल्या चुकीला तात्काळ दुरुस्त करण्याचे काम विरोधी पक्ष, पत्रकार, राजकीय अभ्यासक आणि येथील जनता करत असते मग लोकशाहीची ही शुद्ध प्रक्रिया तुम्ही बिघडवणार आहात का? सन्माननीय अजितदादा पवार साहेब तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता इतक्या असभ्यतेचे वर्णन वर्तन करेल असं कोणालाही वाटत नाही, तुमची तुमच्या पक्षातील कार्यकर्त्यांवरची जरब कमी झाली आहे की काय?  सत्तेच्या विरोधात कोणीही बोलला तरी त्याला अशाच पद्धतीने हाणून मारून दबावशाही, दडपशाही वापरून तुम्ही सामान्य जनमानसांच्या मनातील भावना दडपून टाकणार आहात का ? दहशद निर्माण करणार आहात का?पोलीस प्रशासनाचा वापर लोकांची दडपशाही करण्यासाठी करणार आहात का? असे एक ना अनेक सभाल सध्या सामान्य माणसांच्या मनामध्ये येत आहेत सत्ताधारी पुरोगामी योग्य राजकारणी म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे भाविकाळामध्ये संबंधित कार्यकर्त्यांवर काय कार्यवाही होईल याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.आमच्या बीडचे पालकमंत्री असणारे सन्माननीय अजितदादा पवार हे पुरोगामी नेते आहेत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कुशल राजकीय दृष्टीमध्ये घडलेले नेतृत्व आहे मग असा असंस्कृतपणा महाराष्ट्राला दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांवर किती लवकर कार्यवाही करतील हेच पाहण्याजोग आहे. तूर्तास महाराष्ट्राच्या राजकारणाचा तमाशा ह्याच सत्ताधाऱ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं पाहावायला मिळत आहे. हे वेळीच थांबवा सुसंकृत महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्थर बिघडत चालला आहे तो सुधारा असा सल्ला यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.