पाथर्डी- कोल्हापूर एसटी बसला अपघात
--------------
दुचाकी चालकाच्या पायाला गंभीर दुखापत
----------------
कडा /वार्ताहर
---------------
तालुक्यातील शिराळ रस्त्यावरील चौकात पाथर्डी -कोल्हापूर एसटी बस आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवार दि. 29 रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पाथर्डी कडामार्गे कोल्हापूरकडे जाणाऱ्या पाथर्डी-कोल्हापूर एसटी बसला शिराळ रस्त्यावरील धिर्डी चौकात एसटी बस व दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीचालक शहाजी अंकुश राऊत (वय- 45) रा. कवडगाव ता. नगर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना पुढील उपचारार्थ अहिल्यानगर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच कडा पोलीस चौकीचे अमोल नवले, प्रताप घोडके व गर्जे या पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन जखमींना मदत केली. पुढील तपास कडा पोलीस करीत आहेत.



stay connected