विद्यार्थ्यांनी मिळवला राष्ट्रीय यशाचा मान! इन्स्पायर अबॅकस कोचिंग क्लासेस, वाघोली यांच्या विद्यार्थ्यांचे घवघवित यश

 विद्यार्थ्यांनी मिळवला राष्ट्रीय यशाचा मान!
इन्स्पायर अबॅकस कोचिंग क्लासेस, वाघोली यांच्या विद्यार्थ्यांचे घवघवित यश



पुणे, वाघोली (दि. २७ जुलै) – "आम्ही विद्यार्थी नव्हे, चॅम्पियन घडवतो!" हे ब्रीद सार्थ ठरवत इन्स्पायर अबॅकस कोचिंग क्लासेस, वाघोली येथील विद्यार्थ्यांनी दिनांक २७ जुलै २०२५ रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत घवघवित यश संपादन केले आहे.


या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या वेग, अचूकता आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर विविध गटांमध्ये विजेतेपद पटकावत इन्स्पायर क्लासेसच्या नावलौकिकात भर घातली. यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान समारंभ क्लासच्या वतीने दिमाखात पार पडला.


या यशामागे शिक्षिका सौ. मिरा शेळके मॅडम यांचे अथक परिश्रम आणि मार्गदर्शक अकॅडमीच्या अध्यक्षा सौ. अर्चना शेळके मॅडम यांचे वेळोवेळी लाभलेले प्रेरणादायी मार्गदर्शन हे अत्यंत मोलाचे ठरले आहे.



प्रशिक्षकांचे समर्पित प्रयत्न, विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाले. विद्यार्थ्यांच्या या घवघवित कामगिरीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. इन्स्पायर अबॅकस क्लासेस, वाघोली हे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, गुणवत्ता आणि शैक्षणिक प्रगतीचा आदर्श निर्माण करत आहेत.


📞 मोबाईल: 74985 40760 / 96733 96322

🎓 सौजन्य: इन्स्पायर अबॅकस कोचिंग क्लासेस, वाघोली



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.