दि.31-07-2025 गुरूवार
एसटीचे वाहतुक नियंत्रक बालाजी शिंदे यांची
एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदी निवड
आगाराच्या कामगार-कर्मचाऱ्यांकडून सत्कार
नांदेड - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथील कार्यरत वाहतुक नियंत्रक मा.श्री.बालाजी शिंदे यांची एसटी को-ऑपरेटिव्ह बँक लि. शाखा नांदेडच्या संचालकपदी एसटी बँकेचे राज्याचे एमडी (महाव्यवस्थापक) मा.श्री.विजय ढगे यांनी संचालकपदी त्यांची निवड केलेली आहे. एसटी को-ऑप. बँक लि.शाखा नांदेडची स्थापना 1954 साली झाली असून आज 71 व्या वर्षामध्ये कार्यरत असून 27 हजार सभासद मेंबरशिप असलेल्या अग्रगण्य एसटी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल रापम आगार कामगार-कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांचा बसस्थानक प्रमुख मा.श्री. यासीन हमीद खान यांच्या हस्ते पुष्पहार देवून ह्दय सत्कार करून अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले.
ते प्रमुख वक्ते म्हणून बोलताना आपल्या प्रास्ताविकपर भाषणात म्हणाले की, एसटी बँकेमध्ये आर्थिकरित्या मोठे कर्ज, छोटे कर्ज व ओडीसाठी कोरोना काळानंतर थोडासा व्यत्यय निर्माण झाला असून आज घडीला कामगार कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक कर्जासाठी सुलभता निर्माण करण्यासाठी आपण दखल घ्यावी, असे प्रतिपादन केले. पुढे बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की, नांदेड जिल्ह्यातील तमाम 27 हजार एसटी कामगार-कर्मचारी सभासदांच्या कर्ज वितरण संदर्भाने आपण सजग राहून सेवा द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी नवनिर्वाचित संचालकाकडे शेवटी आपल्या भाषणातून त्यांनी केले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना मा.श्री.बालाजी शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करून म्हणाले की, बँकेच्या आर्थिक कर्ज संदर्भाने कामगार-कर्मचारी सभासदांसाठी मी नेहमी तत्पर असून आपल्याला सेवा देण्यासाठी मी कमी पडणार नाही, असे ते यावेळी आश्वासन दिले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, दीपक मुदीराज, गौतम कोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रापम आगारातील कामगार-कर्मचारी, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------------------------------------------------


stay connected