डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत अशासकीय महाविद्यालयीन प्राचार्य संघटनेचे पुनर्गठन
------------------
------------------
आष्टी (प्रतिनिधी)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत कार्यरत अशासकीय महाविद्यालयीन प्राचार्य संघटनेचे पुनर्गठन करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ क्षेत्रातील प्राचार्य,महाविद्यालय,प्राध्यापक,
विद्यार्थी आदि घटकांच्या समस्या, धोरणात्मक निर्णयांमध्ये सहभाग आणि प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी अशासकीय प्राचार्य संघटनेचे पुनर्गठन करण्यात यावे या पार्श्वभूमीवर प्राचार्य फोरम कार्यान्वित करण्यासाठी संघटनेची बैठक १७ जुन रोजी विद्यापीठ नाट्यगृहात सभागृहात आयोजित करण्यात आली होती.यामध्ये प्राचार्य संघटनेचा पाया घालण्यासाठी प्रारंभिक निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण बैठक २९ जुन रोजी मिलिया महाविद्यालय,बीड येथे आयोजित करण्यात आली.या बैठकीत निवृत्त सदस्यांचा यथोचित सन्मान करुन दिवंगत सदस्य यांना श्रद्धांजली अर्पण करुन रिक्त कार्यकारिणी सदस्यांच्या जागी नवीन सदस्य नियुक्त करण्याचा ठराव संमत करण्यात आला. जिल्हानिहाय रिक्त पदांवर त्या-त्या जिल्ह्यांतील प्राचार्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या ठरावाच्या अनुषंगाने १३ जुलै रोजी शिवाजी महाविद्यालय, पाचोड येथे संघटनेची तिसरी बैठक पार पडली. यामध्ये जिल्हानिहाय नवीन पदाधिकारी आणि सदस्यांची निवड करण्यात आली. या बैठकीत खालीलप्रमाणे कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आले.
अध्यक्ष - डॉ.विजय भोसले,(प्राचार्य, शिवाजी विद्यालय, कन्नड),
उपाध्यक्ष- डॉ. हरिदास विधाते, (प्राचार्य,आनंदराव धोंडे महाविद्यालय, कडा),सचिव - डॉ. सोपान निंबोरे (प्राचार्य,ॲड.बी.डी. हंबर्डे महाविद्यालय, आष्टी),सहसचिव-डॅा हरिदास फेरे
(प्राचार्य,वसंतराव काळे महाविद्यालय ढोकी),
कोषाध्यक्ष- डॅा भारत खंदारे
(प्राचार्य,लालबहादुर शास्त्री महाविद्यालय परतूर),जिल्हानिहाय नवनियुक्त कार्यकारणी सदस्य, धाराशिव - डॉ. प्रशांत चौधरी(बीड), डॉ. शिवदास शिरसाठ, (अंबाजोगाई), डॉ. मोहम्मद ईलीयास, (जालना) - डॉ. रामेश्वर पवार (अंबड), डॉ.सुनंदा तिडके (छत्रपती संभाजीनगर) - डॉ. चंद्रसेन कोठावळे, डॉ.अशोक पंडित, डॉ.मजहर फारुकी यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीनंतरच्या बैठकीत पुढील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जिल्हानिहाय संघटना नव्याने बांधणे, नवीन प्राचार्यांना नेतृत्वाची संधी देणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी,शैक्षणिक वातावरण आणि दैनंदिन प्रशासनातील समस्या यावर सामूहिक निर्णय घेणे,कुलगुरू डॉ. विजय फुलारी सर यांच्याशी समन्वय साधून विद्यापीठ व महाविद्यालय यांच्यातील शैक्षणिक विकासासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करणे. आदी निर्णय घेण्यात आले.निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष प्राचार्य डॉ.विजय भोसले सर यांनी सर्व प्राचार्यांचे आभार मानत. संघटनेच्या माध्यमातून प्राचार्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असून कार्यकक्ष विस्तारण्यावर भर दिला जाईल असे सांगितले.
----------------
stay connected