१६ वर्षापासुन चोपडा पायी दिंडीला पंगत देण्याची भगीरथ धारक यांची परंपरा

 १६ वर्षापासुन चोपडा पायी दिंडीला 
पंगत देण्याची भगीरथ धारक यांची परंपरा  

----------------



-----------------

आष्टी (प्रतिनिधी)


आष्टी तहसिल कार्यालयतील अव्वल कारकुन (शासन) भगीरथ धाराक हे गेली १६ वर्षापासून खानदेश जळगाव जिल्ह्यातुन पंढरीला पायी जाणा-या दिंडीला अन्नदान पंगत देतात.काल बुधवर दि.२५ जुन रोजी  दुपारची पंगत आष्टी  शहरात धारक परिवाराने दिली. दिंडीतील ७० वारकरी व गल्लीतील १०० भावीक उपस्थित होते.आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यातील लाखो वारकरी आपापल्या भागातील दिंड्यामधून पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी येतात.चोपडा ते पंढरपूर हा दिंडी सोहळा मार्गस्थ आहे.संतांनी आयुष्यभर सर्वसामान्य माणसाला माणुसकीचा धर्म शिकवला.भक्तीचे महत्त्व सांगून समता,बंधुत्व,ऐक्य आणि सर्वधर्म समभावाची शिकवण दिली आहे असे प्रवचनात तांदळे महाराज म्हणाले.यावेळी स्टेट बँक आॕफ इंडियाचे शाखाधिकारी राकेश साई,पत्रकार उत्तम बोडखे,दिलीपराव काळे,भगीरथ धारक यांचे भाषणे झाली. यावेळी प्रविण पोकळे,शरद रेडेकर, आण्णासाहेब साबळे,राजेंद्र लाड, बनकर सर आदि मान्यवर उपस्थित होते. श्री भक्त शिरोमणी

नामदेव महाराज पंढरपूर यांचे

फडावरील पायी दिंडी सोहळा

श्री क्षेत्र चोपडा ते श्री क्षेत्र पंढरपूर वै.ह.भ.प.गोविंद महाराज यांचे पदस्पर्शाने पुनीत क्षेत्र चोपडा येथून श्री गुरु केशव महाराज नामदास संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे वंशज यांच्या कृपाशिर्वादाने पांडुरंग परमात्म्याचे दर्शनासाठी पंढरपूर येथे जाणारा पायी

दिंडी सोहळा आहे.

शनिवार दि. ७ जुन २०२०५ रोजी सकाळी चोपडा येथून दिंडी निघून १ जुलै रोजी पंढरपूरला पोहचणार आहे.श्री संत श्रावणबाबा विटनेर व वै.मोठे बाबा आळंदी, श्री. केशव महाराज, पंढरपूर,श्री. ह.भ.प.वै.माधव महाराज,महंत सुशिल महाराज, विटनेर,श्री.ह.भ.प.विजय मोहन देवरे,

श्री.ह.भ.प.शाम रामचंद्र लोहार ,  ह.भ.प.सौ.निता देवरे,ह.भ.प.तेजस महाराज उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.