मराठा सेवा संघ पदाधिकारी व कार्यकारिणी निवडीसाठी शनिवारी बीड येथे बैठक

 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

मराठा सेवा संघ पदाधिकारी व कार्यकारिणी निवडीसाठी शनिवारी बीड येथे बैठक

           बीड (प्रतिनिधी )

    बीड जिल्ह्यातील मराठा सेवा संघाचे आजी-माजी पदाधिकारी, सर्व प्रकारचे सभासद व मराठा सेवा संघाच्या विचाराचे कार्यकर्ते या सर्वांची बैठक शनिवार दिनांक 5 जुलै 2025 रोजी दुपारी 04:30 वाजता बीड येथे आयोजित करण्यात आली आहे.  सदरची बैठक केंद्रीय निवड समिती प्रमुख शिवश्री संदिपान जाधव सर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून विभागीय अध्यक्ष शिवश्री अशोकजी ठाकरे साहेब हे उपस्थित राहणार आहेत. 

       सदर बैठकीमध्ये मराठा सेवा संघ व 33 कक्षाच्या जिल्हा, विभाग व राज्य कार्यकारणी मध्ये कार्य करू इच्छिणाऱ्या सदस्यांनी आपले अर्ज निवड समितीकडे सादर करायचे आहेत. या निवड समितीच्या बैठकीस मराठा सेवा संघ व इतर 33 कक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बंधू भगिनी यांनी वेळेवर उपस्थित राहावे. असे जिल्हाध्यक्ष शिवश्री धनंजय शेंडगे यांनी कळवले आहे. 

         आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यातील समाजाच्या युवा बंधू भगिनींनी या बैठकीस मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन बीड जिल्हा कार्याध्यक्ष इंजि. शिवश्री तानाजी बापू जंजिरे यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.