प्राचार्य सय्यद व उपप्राचार्य कर्डीले यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे शुक्रवारी आयोजन
धानोरा (प्रतिनिधी):-
आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सय्यद वाय. यु. ( राजु मास्टर ) व उपप्राचार्य बाबासाहेब कर्डीले हे संस्थेच्या प्रदिर्घ सेवेतुन अनुक्रमे दि. ३१ मे २०२५ व ३० जून २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवापूर्वी सत्कार सोहळा शुक्रवार दि. २७ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता धानोरा येथील मंगलमूर्ती मंगल कार्यालयात होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता वसतिगृह शिक्षण संस्थेचे सचिव विजयकुमार बांदल हे राहणार आहेत. आ. सुरेशराव धस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आ. विक्रम काळे, आ. सतिष चव्हाण, आ.डॉ. सुधीर तांबे, माजी आ. भिमराव धोंडे माजी आ. साहेबराव दरेकर, माजी आ. बाळासाहेब आजबे, माजी जि. प. सदस्य देविदास धस, माजी शिक्षण सभापती नियामत बेग, सभापती रमजान तांबोळी, जनता वसतीगृहाचे अध्यक्ष सय्यद अब्दुलभाई, शिक्षणाधिकारी पंचगल्ले, गटशिक्षणाधिकारी सौ. सिमा टकले, विस्तार अधिकारी मनोरंजन धस, केंद्रप्रमुख जावेद पठाण , पं. स. सदस्य परमेश्वर शेळके, माजी सभापती अंकुशराव चव्हाण, माजी शिक्षण सभापती उद्धव दरेकर, माजी जि. प. सदस्य राजाभाऊ दरेकर, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रमेशराव पोकळे, सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार गोल्हार, माजी उपसभापती राजेंद्र दहातोंडे, संस्थेचे व्यवस्थापक विशाल बांदल, विठ्ठलराव बांदल, पांडुरंग चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागेश शेळके, चेअरमन काकासाहेब कडर्डीले, उपसरपंच सोमनाथ लगड, उपसरपंच डिगांबर ढोबळे, उपसरपंच प्रियंका कर्डीले, नामदेव शेळके, माजी सरपंच राजाभाऊ शेळके, संदेश शेळके, धैर्यशिल थोरवे, कुमार शेळके, ए.पी.आय साळवे, गणेश शिंदे, मुख्याध्यापक शिवाजी ढोबळे, मुख्याध्यापक गव्हाणे, उपमुख्याध्यापक सय्यद ए. डी., प्राचार्य डॉ. सुपेकर, सरपंच सविता शेळके, सरपंच बाळासाहेब गोफणे, सरपंच सचिन खेत्रे, सरपंच माऊली वाघ, माजी सरपंच बन्सीभाऊ पोकळे, माजी सरपंच दत्ताभाऊ चव्हाण, माजी उपसरपंच संपत कर्डिले, उपसरपंच मनिषा गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जनता वसतीगृह शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि धानोरा, हिवरा, पिंपरखेड, डोंगरगण या गांवच्या ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
stay connected