विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करताना टिप्पर पकडला
अंभोरा पोलिसांची कारवाई;दहा लाखांचा मुद्देमाल जप्त
दौलावडगाव प्रतिनिधी शौकत पठाण : - बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावरील धामणगांव येथील पाथर्डी चौकात विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करण्यासाठी वाळूने भरलेला टिप्पर असल्याची गोपनीय माहिती अंभोरा पोलिसांना मिळताच त्यानी रविवारी रात्रीच्या दरम्यान सापळा रचून ताब्यात घेत कारवाई केली.दहा लाख तीस हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील धामणगांव येथील पाथर्डी चौकात रविवारी रात्रीच्या दरम्यान वाळूने भरलेला टिप्पर असल्याची गोपनीय माहिती अंभोरा पोलिसांना समजातच त्यांनी सापळा रचून कलम ३०३ (२) नुसार पोलीस अंमलदार बालाजी होळंबे याच्या फिर्यादीवरून आरोपी विलास नाना बोरूडे ता.पाथर्डी याच्यावर गुन्हा दाखल करत अटक करून दहा लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, पोलीस अमलदार शिवदास केदार, बालाजी होळंबे, चालक पठाण यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे हे करीत आहेत.
stay connected