धानोरा गावचे सुपूत्र भगिरथ धारक यांची नायब तहसीलदार पदी नियुक्ती
आष्टी ( प्रतिनिधी ) - धानोरा गावचे सुपूत्र भगिरथ धारक यांची नायब तहसीलदार पदी नियुक्ती झाली असून त्यांच्या नियुक्ती बद्दल धानोरा ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला . अतिषय प्रेमळ , हसतमुख व शांत स्वभावाचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते सर्वपरिचीत आहेत . त्यांच्या पदोन्नती देण्यात आल्याच्या वृत्ताने धानोरा ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असुन त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे . त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे अभिनंदन माजी सभापती अंकुशराव चव्हाण , माजी सरपंच राजाभाऊ शेळके , आजीनाथ शेळके , सुरेश चव्हाण , चंद्रभान वामन सरपंच , भगवानराव गायकवाड , अशोक चव्हाण, सतीश शेठ धस , रावसाहेब वाघमारे , पत्रकार सय्यद बबलूभाई , देविदास आप्पा गुंड यांनी केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
stay connected