*वेळापूर मुली शाळेचे कार्य उल्लेखनीय*
*दि.कि.वाळवेकर, लेखाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर.*
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने शाळा प्रवेशोत्सव शाळा भेट कार्यक्रमाचे जिल्ह्यात आयोजन करण्यात आलेले असून यावेळी वेळापूर मुली शाळेस सोलापूर जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी श्री.दि.कि.वाळवेकर यांनी भेट व विविध शैक्षणिक बाबी तपासल्या.
प्रारंभी शाळेच्या शैक्षणिक कामाची माहिती नितीन चव्हाण यांनी दिली.
मुख्याध्यापक युन्नूस तांबोळी यांनी निरीक्षक दि.की.वाळवेकर यांचा शाळेच्यावतीने सत्कार केला.
यावेळी दि.कि.वाळवेकर यांनी शाळा भेटी प्रसंगी विविध बाबींची तपासणी करून माहिती घेतली.यात विविध अनुदाने जमा व खर्च, पाठ्यपुस्तके,बुट व गणवेशाची तपासणी केली.शालेय पोषण आहार, विद्युतपुरवठा, CCTV ,पट व गुणवत्ता याची माहिती घेतली, अद्यावत संगणक कक्षास भेट दिली.शाळेच्या शैक्षणिक कामाविषयी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन म.शि घोगरे यांनी केले.
यावेळी सौ.प्र.रा इंगोले, श्रीम.आ.शां.जैन, कॄ.तु तुपे,प्र.धु.पांगे, श्रीम.कि.ह.घाडगे,सौ.क.सं आवटे आदि शिक्षकवर्ग उपस्थित होते.
stay connected