अदिनाथ स्वयंरोजगार सेवा संस्था पुणे यांच्या तर्फे जिल्हा परिषद शाळेला बॅग वाटप
आष्टी :- अदिनाथ स्वयंरोजगार सेवा संस्था, पुणे संचालक श्री अजिनाथ देवकर ( माजी विद्यार्थी ) जिल्हा परिषद शाळा शिरापूर ता. आष्टी जिल्हा बीड यांच्या वतीने शाळे साठी विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप करण्यात आल्या.
श्री अजिनाथ देवकर हे मूळचे शिरापूर गावचे रहिवाशी असून अत्यंत गरीब परिस्थिती मधुन त्यांनी त्याचे प्राथमिक शिक्षण शिरापूर येथे पूर्ण केले,व उर्वरित शिक्षणा साठी त्यांना गाव सोडावे लागले. पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना सुरुवातीच्या च्या काळात त्यांनी कंपनी मधुन जॉब करून आपलें शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करता करता आता ते स्वतः कंपनी चे मालक झाले. आणि पुण्या मद्ये त्यानी आपली कंपनी उभा केली. आणि
आता सद्या खेड्या गावातील मुलांना ते अगदी मोफत रोजगार उपलब्ध करून देत आहेत. 2 हजार ते 3 हजार मुलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
अशीच सामाजिक बांधिलकी जपत आपण याच शाळेत शिकून मोठे झाले आहोत. आपण सामाज्याचे काहीतरी देण लागतो याच उद्देशाने, या अगोदर सुद्धा शाळे साठी त्यांनी संगणक मोफत दिले आहेत. आणि आता शाळा सुरु होणार असून शाळेच्या पहिल्यच दिवशी त्यांनी शाळेला शालेय बॅग भेट दिल्या आहेत.
या कार्यक्रमाला शिरापूर गावचे सरपंच श्री सोमनाथ गायकवाड व उपसरपंच श्री सचिन काळे शाळेचे मुख्यद्यापक महाडिक सर शिक्षक स्टाफ कर्डीले सर, कुटे सर, पोकळे सर, एकशिंगे सर, जिवे मॅडम, पोकळे मॅडम ग्रामस्थ श्री नणंकुमार तागड, जालिंदर देवकर, सावन कुमार तागड, अमोल बोरुडे,झुंबर चव्हाण ( माजी सरपंच ) सिद्वेश्वर गिलचे, अर्जुन बोरुडे, सिताराम बोरुडे, अजिनाथ उकांडे, अल्ताफ सय्यद, पंडित पगारे अदी मान्यवर उपस्थित होते
या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे
stay connected