विकास कामे हीच आमच्या कामाची पावती; आ.धस यांच्या माध्यमातून गावाला सुजलाम सुफलाम करणार!
दौलावाडगाव प्रतिनिधी ÷ गेल्या अनेक वर्षांपासून विकास कामाला बसलेली खिळ व कागदोपत्री होणारा विकास लोकांनी प्रत्यक्ष पाहिला आहे.पण विकास काय असतो.हे आम्ही आरश्या प्रमाणे दाखवत आहोत.विकास कामे हीच आमच्या कामाची पावती असून आ.सुरेश आण्णा धस याच्या माध्यमातून गावाला सुजलाम सुफलाम करणार असल्याचे अरणविहारा तागडखेल ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंचपती आण्णासाहेब शिरसाठ यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
आष्टी तालुक्यातील अरणविहारा,तागडखेल ही ग्रुप ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावासह लमाणतांड्यावर गेल्या अनेक वर्षांपासून विकास कामे बोटावर मोजता येतील एवढेच झाले.बाकीचे कामे कागदोपत्री दाखवून लाखो रूपयांचा निधी आपल्या खिशात घालत गावासाठी आलेला निधी हडप केला.आणि गावाला विकासापासून कोसोदूर ठेवण्याचे पाप काही महाभाग लोकांनी केले.पण जेव्हापासून गावाने आमच्यावर विश्वास टाकून निवडून देत सरपंच केले.तेव्हापासून आजपर्यंत ग्रामपंचायत अंतर्गत अनेक विकासकामे केली.एवढेच नव्हे तर पदरमोड करून देखील पैसा गुंतवणूक केला.आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश आण्णा धस,युवानेते जयदत्त भैय्या धस,सागर आप्पा धस यांचे वेळोवेळो मार्गदर्शन मिळत असून यापुढे देखील त्याच्या माध्यमातून गावात विकासकामे करून गावाला सुजलाम सुफलाम करणार असल्याचे आण्णासाहेब शिरसाठ यांनी सांगितले.
stay connected