शनिवारी रात्री शेठजींवर अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 शनिवारी रात्री शेठजींवर अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल




दौलावडगाव प्रतिनीधी -  आई,वडिल राज्यासह, परराज्यात कोळश्याच्या भट्टीवर काम करतात.तर लेकरं शेठजीच्या घरी सोडून गेल्याने शेठजी या लेकरांना जनावरांची राखण, शेण काढणे,हातपाय दाबून देणे,धुणी,भांडी करणे यासह अनेक कामे करून घेत असल्याचे निदर्शनास आल्याने १५ बालकामगारांची शुक्रवारी सकाळी सुटका करण्यात आल्यानंतर रात्री बालकल्याण समितीसमोर हजर करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा शेठजींवर अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    आष्टी तालुक्यातील सेवालाल तांडा येथील शेठजीकडे राज्यासह, परराज्यातील कोळसा भट्टीवर काम करणाऱ्या लोकांना आर्थिक स्वरूपात उचल देऊन बाहेर ठिकाणी पाठवले जाते.त्याची मुले शेठजीच्या घरी ठेवले जातात.या मुलाकडून धुणी,भांडी,शेण काढणे,त्याचे हातपाय दाबून देणे, जनावरांचा संभाळ करणे यासह अनेक कामे मनाविरूध्द करून घेतले जात असून त्याना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असून वेठबिगारीचे कामे करूवून घेतले जात असल्याचे समोर आल्यानंतर शुक्रवारी अहिल्यानगर येथील जिल्हा कृती दलाने धाडसत्र टाकताच हा प्रकार समोर आल्यानंतर लेकरांना अंभोरा पोलिस ठाण्यात आणण्यात आले.तिथे रितसर नोंद करून बीड येथील बालकल्याण समितीसमोर हजर केल्यानंतर जबाब नोंदवून  बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी अंभोरा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश शुक्रवारी रात्री दिले.अंभोरा पोलिसांनी बालकल्याण समितीला परत पत्र दिले.पण गुन्हा दाखल झाला नव्हता.अखेर शनिवारी रात्री उशिरा ९ शेठजींच्या विरोधात  पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे याच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम १४६,७५,७९, बाल न्यायिक अधिनियम २०१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे करीत आहेत.

     यांनी केली होती कारवाई 

अहिल्यानगरचे सहायक कामगार आयुक्त कार्यालयाचे संदिप हरमळकर,ललिता दाभाळे,उद्यकुमार सुर्यवंशी, सौरभ हामंद,बालकल्याण समितीच्या ॲड.अनुराधा येवले,अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संस्थेचे दिलीप गुंजाळ,सिराज शेख,मंगेश थोरात,संध्या कुलकर्णी,मयूरी वनवे,मनपाच्या वतीने आशिष हंस,सहायक फौजदार अजय बेरड,जालिंदर माने,अशोक लिपणे,रमाकांत गावडे,ज्योती शिंदे,चाईल्ड लाईनचे राहूल वैराळ यांनी ही कारवाई केली होती.

 याच्यावर गुन्हा दाखल 

उत्तम चव्हाण ,दिलिप राठोड ,संजू जाधव ,संतोष राठोड ,रमेश राठोड , विष्णू जाधव ,दत्तू राठोड ,किशोर राठोड,अशोक राठोड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.