वाढदिवसाच्या शुभेच्छा जगण्याची उमेद वाढवतात --- जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे ----------------- प्रा.निसार शेख यांचे पत्रकारांकडून अभिष्टचिंतन

 वाढदिवसाच्या शुभेच्छा जगण्याची उमेद वाढवतात
--- जेष्ठ पत्रकार  उत्तम बोडखे
-----------------
प्रा.निसार शेख यांचे पत्रकारांकडून अभिष्टचिंतन

-------------------




-------------------

आष्टी (प्रतिनिधी)

दैनंदिन जीवन जगत असताना अनेक समस्या प्रश्न सर्वांच्या सोबत असतात.या समस्यांमधून वाढदिवसासारख्या उत्सवातून अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छा,आशीर्वाद या माध्यमातून मनुष्याला जगण्याची ऊर्जा, शक्ती आणि बळ मिळते असे मत ज्येष्ठ पत्रकार तथा  उपसंपादक उत्तम बोडखे यांनी व्यक्त केले.

    आष्टी येथील पत्रकार प्रा.निसार शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पत्रकार बांधवांच्यावतीने त्यांना केक खाऊ घालत पेढा भरवून आणि बुके देत फेटा बांधून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांना दीर्घायुष्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना केली.  यावेळी ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे बोलत होते.

यावेळी पत्रकार आण्णासाहेब  साबळे, समीर शेख, संतोष नागरगोजे यांनी प्रा.निसार शेख यांना पुष्पगुच्छ आणि फेटा बांधून शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे पुढे म्हणाले की, वाढदिवसाच्या माध्यमातून प्रत्येक मनुष्याला एक नवी ऊर्जा शक्ती आणि बळ मिळते. मनुष्य हा उत्सवप्रिय असतो.ही भावना लक्षात घेता दैनंदिन प्रश्न समस्या यातून विरंगुळा आणि नवचैतन्य येण्यासाठी वाढदिवस हा एक महत्त्वपूर्ण क्षण असतो.यातून जगण्यासाठी तेजस्वी दिशा मिळते असे सांगत ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी प्रा. निसार शेख यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पत्रकार प्रा निसार शेख यांनी दैनिक सकाळ या वृत्तपत्राच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांचा बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वसामान्यांशी विविध रूपाने संबंध आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक राजकीय शैक्षणिक वैद्यकीय धार्मिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसानिमित्त भरभरून आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. यामध्ये आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार तथा माजी मंत्री सुरेशरावजी धस, आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, पत्रकार संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब साबळे, दैनिक सकाळचे जिल्हा बातमीदार दत्ता देशमुख, पत्रकार तथा मुख्याध्यापक जावेद पठाण, पत्रकार संतोष नागरगोजे, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते समीर शेख, पत्रकार शहानवाज पठाण, पत्रकार अफसर शेख, पत्रकार प्रवीण पोकळे, पत्रकार नितीन कांबळे, शिक्षक नेते बा म पवार, पत्रकार रघुनाथ कर्डिले, पत्रकार दिगंबर बोडखे , तेजवार्ता न्यूजचे संपादक सय्यद बबलूभाई, सरपंच राख शिक्षक नेते राजेंद्र लाड, प्रख्यात कवी प्रा सय्यद अल्लाउद्दीन, डॉ हुमायुदिन सय्यद, डॉ पठाण, सरपंच शरद देसाई, प्राचार्य कैलास वायभासे, उप प्राचार्य गहिनीनाथ एकशिंगे,  ह भ प डॉ सविताताई शास्त्री खेडकर  यांच्यासह विविध राजकीय सामाजिक वैद्यकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.