अहमदाबाद विमान दुर्घटनेत कराडच्या सोमवार पेठेतील ढवळीकर कुटुंबातील दांपत्याचाही मृत्यू
सातारा प्रतिनिधी - (विवेक बारमान ) - लंडनला जाणाऱ्या विमानाला गुरुवारी गुजरातमध्ये भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आणि संपूर्ण देश या बातमीने हादरून गेला या अपघातात कराडच्या सोमवार पेठेतील ढवळीकर कुटुंबातील एक विवाहिता व तिच्या पतीचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे
गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर गुरुवारी दुपारी एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातावेळी विमानात एकूण मिळून 242 जण प्रवासी होते. हे विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे विमानामधील प्रवाशी आणि क्रू मेंबर्सच्या शरीराचा अक्षरशः कोळसा झाला. यामुळे त्यांचे मृतदेह देखील ओळखता येत नव्हते. परंतु, इतक्या भीषण अपघातामधून रमेश विश्वासकुमार हा एकमेव प्रवासी बचावला गेला आहे दरम्यान कराडमधील सोमवार पेठेतील प्रकाश ढवळीकर यांची कन्या कल्याणी व त्यांचा जावई गौरव या दोघांचाही या भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे हे दाम्पत्य कम्पनी कामानिमित्त लंडनला निघाले होते
कल्याणी ही लंडनला काही वर्षांपूर्वी शिक्षण घेत होती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिचा विवाह गुजरात अहमदाबाद येथील गौरव ब्रम्हभट याच्याशी झाला या दाम्पत्याला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत
कल्याणीचा पती गौरव हा लंडनमधील एका कंपनीचा ब्रँड आंबेसेडर म्हणून कार्यरत होता दरम्यान हे दोघेही लंडनला गौरव काम करत असलेल्या कम्पनीच्या कॉन्फरन्ससाठी सदर विमानाने लंडनला जाण्यासाठी चालले होते दरम्यान त्यांचा या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला
सुरुवातीला हे दोघेही जखमी झाले आहेत असे प्रथमदर्शनी सांगण्यात आले त्यानंतर कराडमधून ढवळीकर कुटुंबीय गुजरातला रवाना झाले त्यावेळी मृतांच्या जाहीर केलेल्या नावांच्या लिस्टमध्ये त्यांची मुलगी व जावई यांच्या नावांचा उल्लेख केला गेला त्यादरम्यान या उभयतांचे मृतदेह ताब्यात दिले की नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही
stay connected