स्टेट बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर शिबिरात 50 दात्यांनी केले रक्तदान

 स्टेट बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर 
 शिबिरात 50 दात्यांनी केले रक्तदान 



---------------

कडा/ वार्ताहर

-----------------

येथील भारतीय स्टेट बँकेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर कडा शाखेत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 50 जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.  


एक जुलै रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाचा 70 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त बँकेच्या कडा शाखेत मंगळवारी दि. 17 जून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अहिल्यानगर येथील अर्पण ब्लड बँकेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात बँकेचे कर्मचारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांसह पन्नास बँक खातेदारांनी आपला सहभाग नोंदवला. सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी बँकेचे शाखा व्यवस्थापक नवनाथ शेळकेसह त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. बँकेच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

----------%%-----



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.