पाच वर्षापासून १०० टक्के निकाल देणारे आष्टीचे पं.नेहरु विद्यालय...
-------------------
------------------
आष्टी (प्रतिनिधी) आष्टी येथील शेतकरी शिक्षण संस्था संचलित आष्टी शहरातील पंडीत जवाहरलाल नेहरु विद्यालयाचा एस.एस.सी. परिक्षा मार्च २०२५ चा शेकडा निकाल १०० टक्के लागला आहे. या शाळेतुन १८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती ते सर्वची सर्व उत्तीर्ण झाले असल्याचे मुख्याध्यापक सुरेश बोडखे यांनी सांगीतले. पं.नेहरू विद्यालयाने १० वी.बोर्ड परीक्षेत राखली यशाची परंपरा कायम,१२ विद्यार्थ्यांनी घेतली उत्तुंग गरुडझेप घेतली आहे.१० वी.
बोर्ड परीक्षेत आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयाने १० वी.बोर्ड परीक्षेत याही वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या १० वी. बोर्ड परीक्षेचा निकाल जाहिर झाला आहे.पंडीत नेहरू माध्यमिक विद्यालयाचे १८८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ९० ते १०० टक्के गुण संपादन करणारे ५९ विद्यार्थी,८० ते ९० टक्के गुण संपादन करणारे ५६ विद्यार्थी, ७० ते ८० टक्के गुण संपादन करणारे ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे मुख्याध्यापक सुरेश बोडखे यांनी सांगीतले.आदित्य सुरेश बोडखे १०० टक्के,आदित्य रविंद हुमे १०० टक्के, कु. वैष्णवी बापूराव कुत्तरवाडे १०० टक्के (समान गुण सर्वप्रथम) कु. समृध्दी चंद्रकांत बन्सोडे ९९.४० टक्के (व्दितीय)
कु.पवार गौरी प्रविण ९९ टक्के (तृतीय), कु.तनिष्का प्रदिप धोंडे ९८.८० टक्के, सोहम अशोक फुंदे ९८.६० टक्के, ओमकार सुभाष गिरी ९८.६० टक्के, कु.वृषाली लक्ष्मण टकले ९८.६० टक्के,कु.भक्ती मोहन झगडे ९८.४० टक्के,विश्वप्रताप अशोक सिरसाट ९८.२० टक्के,
कु.प्राजक्ता ज्ञानेश्वर राऊत ९८ टक्के, सिध्दि चंद्रकांत बान्सोडे ९६.६० टक्के गुण संपादन करून यशाची गरूड झेप घेतली आहे.या गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे, डॉ.अजय धोंडे, अभय धोंडे,जेष्ठ संचालक विठ्ठलराव बनसोडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.बी.राऊत,प्रा.शिवदास विधाते, माऊली बोडखे, दत्तात्रय गिलचे, संजय शेंडे,पंडीत शाळेचे प्राचार्य सुरेश बोडखे व सर्व शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे अभिनंदन केले.
------------------
हरिनारायण स्वामी
विद्यालय क-हेवाडी
-------------------
आष्टी तालुक्यातील किसान शिक्षण संस्था संचलित क-हेवाडी येथील हरिनारायण स्वामी विद्यालयाचा एस.एस. सी.परिक्षा मार्च २०२५ चा शेकडा निकाल ९६ टक्के लागला आहे.सांगळे आकांक्षा रामदास ९३.६० टक्के (प्रथम), सांगळे शुभांगी शिवाजी -९२. ८० टक्के (द्वितीय),सांगळे कोमल बाबासाहेब -९०.२० टक्के (तृतीय) सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे,डॉ.अजय धोंडे,प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.बी.राऊत,प्रा.शिवदास विधाते,दत्तात्रय गिलचे,माऊली बोडखे,संजय शेंडे,सरपंच उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थांनी शाळांचे मुख्याध्यापकांनी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
---------------
stay connected