*सात्रळच्या रयत विद्यालयाने दहावीच्या निकालाची परंपरा कायम राखली*
सात्रळ-(वार्ताहर) राहुरी तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालयाने नुकत्याच जाहीर झालेल्या एस.एस.सी परीक्षा-२०२४-२५ मध्ये यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.यात विद्यालयाचा निकाल ८६.००% टक्के लागला आहे. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य सिताराम गारुडकर यांनी दिली.
विशेष बाब म्हणजे कनिष्ठ विद्यालयातील १५० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यामध्ये २६ विद्यार्थी विशेष प्राविण्य व ३७ विद्यार्थी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहे.
विद्यालयातील अनुक्रमे विद्यार्थी
1)भाले सुजल स्वप्निल-95.00%
2) भोत श्रवण अमोल-92.60
3)कोहकडे सार्थक भारत-92.40%
4)शिंदे सार्थक प्रकाश-92.00%
5)शिंदे संस्कार प्रभाकर-90.20%
टक्के गुण मिळवून विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष-अरुण कडू पाटील, उत्तर विभागाचे अध्यक्ष आशुतोषदादा काळे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक अधिकारी प्रमोद तोरणे, बाबासाहेब नाईकवाडी, स्कूल कमिटी सदस्य,ॲड. विजयराव कडू पाटील, संभाजीराव चोरमुंगे, बबनराव कडू पाटील,शांतीभाऊ गांधी,सात्रळचे सरपंच सतिष ताठे,भास्करराव फणसे,प्राचार्य सिताराम गारुडकर,पर्यवेक्षिका हेमलता साबळे, माजी प्राचार्य राजेंद्र बडे,माजी पर्यवेक्षिका सुशिला थोरात, तसेच स्थानिक स्कूल कमिटी, पालक शिक्षक संघ,शाळा व्यवस्थापन व विकास समिती,माता पालक संघ,सर्व ग्रामस्थ पालक,सर्व सेवकवृंद शिक्षण प्रेमी व विद्यार्थी तसेच पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ सात्रळ, सोनगाव, धानोरे, तांभेरे,माळेवाडी,डुक्रेवाडी,निंभेरे, कानडगाव,तुळापूर,ताहाराबाद, वरशिंदे -वाबळेवाडी झरेकाठी,तांदुळनेर पाथरे, हनुमंतगाव, परिसरातील सर्वच... स्तरातून अभिनंदन होत आहे.
stay connected