बीड जिल्हा ॲथलेटिक्स खेळाची आष्टी येथे निवड चाचणी*

 *बीड जिल्हा  ॲथलेटिक्स खेळाची आष्टी येथे  निवड चाचणी*



बीड  : महाराष्ट्र अथलेटिक्स संघटनेच्या वतीने मुंबई/पुणे येथे आयोजित वरिष्ठ (महिला/पुरुष)गट  राज्य अजिंक्यपद  स्पर्धा होत आहेत  या स्पर्धेत  बीड जिल्ह्याचा संघ सहभागी होणार आहे. 

  या संघाची निवड करण्याकरिता  आष्टी येथील डाॅ.बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन  करण्यात  आले आहे.दिनांक  1/6/2025  रविवार रोजी सिनियर पूरुष व महिला गटाची निवड चाचणी  सकाळी 7  वा. सुरु होईल. 

 महाराष्ट्र अथलॅटिक्स असोसिएशनच्या वतीने  नियुक्त  केलेले प्रा. डाॅ. भागचंद्र  सानप , दिनेश पवार , प्रा.डाॅ.संतोष वनगुजरे , प्रा. रविन्द्र खरात व प्रा.सुखदेव माने या पाच सदस्याची  बीड  ज़िल्हा अथलेटिक्स संघाची निवड  करण्याकरिता सदस्य म्हणुन  नियुक्ती करण्यात  आली आहे.

 बीड जिल्हा   संघटनेच्या वतीने आयोजित  जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व  निवड चाचणी मध्ये 100मी . ,200मी., 400मी. ,800मी.,1500मी.,5000मी.,10000 मी.,3000मी. स्टीपलचेस,लांब उडी ,उंच उडी,बांबू उडी,गोळा फेक,थाळी फेक,भाला फेक,हातोडा फेक,4*100मी रिले,4*400 रिले व 20 किमी चालणे इत्यादी गटात या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेमधून  विजयी खेळाडू  मुले व मुलींची निवड बीड  जिल्हा संघात केली जाणार आहे.खेळाडूंनी सोबत आधार कार्ड ,जन्म दाखला(नगरपालिका/ग्रामपंचायत), २ पासपोर्ट साइज फोटो,10वी प्रमाणपत्र(सनद), सोबत आणावे. जिल्हा संघात निवड झालेल्या खेळाडुंना AFI ची UID नंंबर  काढणे अनिवार्य  राहील. 

या स्पर्धेत 18 वर्षांवरील  फक्त बीड जिल्ह्यातील खेळाडूच सहभागी होऊ शकतात.या स्पर्धेत अधिकाधिक खेळाडुनी सहभागी व्हावे असे आवाहन  जिल्हा संघटनेच्यावतीने करण्यात  आले आहे.

बीड जिल्ह्य़ातील  पात्र व ईच्छुक  खेळाडुंनी दिनांक. 

पर्यत नाव नोंदणी 100 रु. प्रति क्रीडा प्रकार या प्रमाणे दिनेश पवार (मो.8308378143 )                   , व प्रा. डाॅ. संतोष वनगुजरे ( मो.  7709135151  ) यांच्याकडे दिनांक 30 मे पर्यत  नाव नोंदणी करावी . असे आवाहन  करण्यात आले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.