शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये भाऊसाहेब गिऱ्हे व अशंका मडके / गिऱ्हे मॅडम यांचा प्रथम क्रमांक

 *शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये भाऊसाहेब गिऱ्हे व अशंका मडके / गिऱ्हे मॅडम यांचा प्रथम क्रमांक*



      *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे महाराष्ट्र SCERT मार्फत आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ निकाल.*






    दिनांक १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले होते या अंतर्गत तालुका जिल्हा व राज्य या प्रत्येक स्तरावर इयत्ता पहिली ते अध्यापक विद्यालय यादरम्यान प्रत्येकी सहा गटांमधून एकूण 28 विषयांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण महाराष्ट्र राज्यात 36 जिल्ह्यातील एकूण 18220 व्हिडिओ शासनाच्या वेबसाईटवर प्राप्त झाले होते.

     या व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कडा नं.१ केंद्र कडा तालुका आष्टी जिल्हा बीड या शाळेतील. तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक भाऊसाहेब भास्कर गिऱ्हे यांनी चार पारितोषिक मिळवले.अध्यापक विद्यालय गटात, सामाजिक शास्त्र विषयात बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच ३ री ते ५ वी या गटात गणित विषयात आष्टी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला, ६वी ते ८वी या गटात भाषा विषयात आष्टी तालुक्यात द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले.

       तसेच शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ एज्युकेशन आष्टी, अध्यापक विद्यालयातून सहभाग घेऊन अशंका शिवाजी मडके यांनी इयत्ता १ली व२री विभागात व्हिडिओ निर्मितीमध्ये इंग्रजी विषयात जिल्ह्यात प्रथम क्रमांक व तालुक्यात तृतीय क्रमांक मिळून यश संपादन केले. सध्या मडके मॅडम जनता वस्तीगृह शिक्षण संस्था धानोरा जॅक एन जील प्री स्कूल येथे कार्यरत आहेता. जनता वस्तीग्रह शिक्षण संस्थेच्या वतीने अध्यक्ष. अब्दुल भाई सय्यद,  सचिव. विजयकुमार बांदल अण्णा, व्यवस्थापक. विशाल भैया बांदल साहेब,  सह. प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सह संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मडके मॅडम यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



 बदलत्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा पार पाडण्यासाठी ई साहित्य निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षकांसाठी ही स्पर्धा गेल्या वर्षी आयोजित केली होती. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने आधुनिकतेची कास धरत विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांना सुद्धा एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला होता.या स्पर्धेसाठी अनेक शिक्षक यामध्ये सहभागी झाले होते. जिल्हास्तरीय बक्षिस वितरण कार्यक्रम २२ मे २०२५ वार बुधवार रोजी  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई येथे बक्षीस रक्कम,प्रमाणपत्र व  सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.केंद्रीय प्राथमिक शाळा कडा शाळेचे शिक्षक भाऊसाहेब गिऱ्हे यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, केंद्रप्रमुख ,शाळा व्यवस्थापन समिती , मुख्याध्यापक,पालक-शिक्षक संघ, माता-पालक संघ, पदाधिकारी ,सहकारी शिक्षक विद्यार्थी,पालक, शिक्षण प्रेमी नागरिक, यांनी त्यांचे अभिनंदन केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.