मातृ दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय खेळाडू...अविनाश साबळे यांच्या घरी सुरेश पाटलांनी मातोश्रीसह दिली भेट.
------------
------------
आष्टी (प्रतिनिधी)
आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे, क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार प्राप्त आणि नुकताच महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार देऊन गौरव केलेले विश्ववेजेता अविनाश साबळे यांच्या घरी मातृदिनाच्या दिवशीच शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा समाजसेवक सुरेश पाटील यांनी आपल्या आईसह भेट दिली.
अविनाश साबळे यांनी आत्तापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत यापैकी प्रमुख पुरस्कार म्हणजे अर्जुन पुरस्कार २०२२ मध्ये क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात आला आहे त्याशिवाय अविनाश साबळे यांना नुकताच महाराष्ट्र सरकारचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आणि अतिविशिष्ट सेवा पदक देखील देण्यात आले आहे. अविनाश साबळे यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्ण व रौपे पदक जिंकले आहे २०१८ मध्ये त्यांनी ३००० मीटर स्लीपर चेस मध्ये राष्ट्रीय विक्रम केला होता तसेच २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांनी रौप्य पदक जिंकले होते.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक स्पर्धेमध्ये पराक्रम करत भारताला सुवर्णपदक, रौप्य पदक मिळवून देणारे, भारताचे प्रतिनिधित्व करणारे, राष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रातील विविध पुरस्कार व लष्करामधील उत्कृष्ट सेवा बद्दल मिळालेले पुरस्कार अविनाश साबळे यांच्या आष्टी तालुक्यातील मांडवा गावातील घरी जाऊन सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी आपल्या मातोश्रीसह भेट घेतली. यावेळी अविनाश साबळे यांचे तोंडभरून कौतुक केले व जन्मदात्या आई वडिलांचे मातृदिनानिमित्त आशीर्वाद घेतले. यावेळी अविनाश साबळे यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
stay connected