निळा येथे वैशाखी बौद्ध विहारामध्ये बुद्ध पौर्णिमा साजरी

 निळा येथे वैशाखी बौद्ध विहारामध्ये बुद्ध पौर्णिमा साजरी 



लोहा :- तालुक्यातील येथे निळा येथे वैशाखी बौद्ध विहारामध्ये बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. बुद्ध पौर्णिमा निमित्त सकाळी तथागत  भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची पुजा करन्यात आली व सामुहिक रीत्या त्रिशरण पंचशील ग्रहण सहभागी उपासक ऊपाशिका, बालक बालीका यानि ग्रहण केले व

जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.आसे उपासक  विजय कुमार जोंधळे यांनी सांगितले व

उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

वैशाखी बौद्ध  विहार येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमास उपा.पांडुरंग वाघमारे,मरीबा वाघमारे, गौतम वाघमारे,साधु जोंधळे, साहेब वाघमारे, किशनराव जोंधळे,आशोक वाघमारे, पंडीत वाघमारे उपस्थित होते,

 त्यानंतर उपस्थितांना खिर दान वाटप करुन मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करन्यात आला



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.