कु.सबा समीर सय्यद दहावी बोर्ड परीक्षेत तृतीय

कु.सबा समीर सय्यद दहावी बोर्ड परीक्षेत तृतीय 

--------------------------------------------




दहावी बोर्ड परीक्षेत मोतीलाल कोठारी विद्यालय कडा या शाळेतील विद्यार्थीनी कु सबा समीर सय्यद हिने 97.60% मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. तिला यासाठी तिच्या शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले सबा सय्यद हिने आज पर्यंत शालेय शिक्षण घेत असताना अनेक राज्यस्तरीय जिल्हास्तरीय निबंध भाषण स्पर्धेत पारितोषिक मिळवले आहे तिचे आकाशवाणी केंद्र बीड येथे भाषणाचे प्रसारण झालेले आहे सबाला जिल्हास्तरीय आदर्श गुणवंत विद्यार्थीनी हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. तसेच सबा पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप धारक  विद्यार्थिनी आहे. दहावीच्या परीक्षेतील यशासाठी तिने केलेले कष्ट जिद्द चिकाटी आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे तिला हे यश मिळाले . तिच्या या यशासाठी मुख्याध्यापक शिकारे सर ,प्रा .डॉ जमीर सर नईमभैय्या शेख, समीर सय्यद सर यांनी तिचे अभिनंदन केले आहे तेच पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.