इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जनता विद्यालयात सत्कार संपन्न

 इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जनता विद्यालयात सत्कार संपन्न


जनता विद्यालय


Ashti - जनता वस्तीगृह शिक्षण संस्थेच्या जनता माध्यमिक विद्यालय, धानोरा चे दहावीच्या परीक्षेत सुयश मिळवले असुन परिक्षेत उत्तीर्ण यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला . महाराष्ट्र राज्य माध्यमिक महामंडळ एसएससी बोर्ड परीक्षा 2025 मध्ये उत्तुंग यशाच्या भरारीची परंपरा कायम राखत खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. जनता विद्यालयाची विद्यार्थीनी कुमारी श्रेया नवनाथ शेलार हिने 97.80% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला . तर

कुमारी आरुषी दत्तू चितळे हिने  97.40% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला . तर यश महादेव पठारे याने 96.40% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला .

तसेच टॉप टेन मध्ये आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत - 

यश आसराजी सांगळे 95.0%

कुमारी मयुरी दीपक वाडेकर 94.80%

कुमारी श्रावणी संदीप ढोबळे 94.80%

कुमारी श्रावणी भाऊसाहेब झांजे 94.20%

चि.स्मित सतीश आल्हाडे 93.40%

 चि. अलमिजान मुकतार सय्यद 93.00%

कुमारी.अल्फिया मुकतार शेख 92.80%

कुमारी.निकिता प्रेमराज दातीर 92.80% 

तर विद्यालयाचा एकूण निकाल 94.28 % टक्के लागला असून, 105  विद्यार्थी विशेष प्राविण्‍यासह उत्तीर्ण झाले आहेत. तसेच 

80 % टक्के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी 56 आहेत  व 90% टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे 35  विद्यार्थी आहेत या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन  जनता वस्तीग्रह शिक्षण संस्थेचे सचिव श्री.विजयकुमार अण्णा बांदल, अध्यक्ष श्री. सय्यद अब्दुल भाई तसेच  मार्गदर्शक व व्यवस्थापक श्री विशाल भैयाजी बांदल आणि मुख्याध्यापक तथा प्राचार्य  श्री. सय्यद वायु सर , उप मुख्याध्यापक श्री.ढोबळे सर ,पर्यवेक्षक श्री. सय्यद ए.डी सर , तसेच सर्व शिक्षक ,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.. या सर्व विद्यार्थी व पालकांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला . 

विडीओ वृत्त पहा👇📽️




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.