मा. बाबाराजे देशमुख यांची शिवराज सोलर इंटरप्राईजेस ला सदिच्छा भेट
आष्टी : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेले, मराठा साम्राज्य संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.बाबाराजे देशमुख यांनी नुकतीच आष्टी येथे मा. अमृतराजे आजबे पाटील यांच्या शिवराज इंटरप्रायजेस & सूर्योदय सोलर पॉवर कंपनीच्या व्यावसायिक कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता.त्यांचे इंटरप्राईजेस चे सर्वेसर्वा मा.अमृतराजे आजबे व शिवराज अमृतराजे आजबे यांच्यासह मित्र परिवाराकडून सत्कार करत , हृदयपूर्वक स्वागत करण्यात आले सत्कार प्रसंगी बोलताना म्हणाले की,सोलरसाठी शासनाच्या वतीने 78 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. ग्राहकांनी विश्वासार्हता जपणाऱ्या, आपल्या आष्टीतील या एजन्सीच्या माध्यमातून जरूर लाभ घ्यावा असे आवाहन करत,शिवराज इंटरप्राईजेसची ग्राहकाच्या उदंड प्रतिसादाने व्यावसायिक भरभराट होवो अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
तसं पाहायला गेलं तर बाबाराजे देशमुख आणि अमृतराजे यांचे अनेक वर्षाचे घनिष्ठ संबंध आहेत. बाबाराजे देशमुख यांचे सामाजिक चळवळीतील योगदान फार मोठे आहे. महाराष्ट्राच्या समाजकारणात त्यांचा मोठा धबधबा आहे. त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊन त्यांना मानणारा मोठा चाहता वर्ग महाराष्ट्राच्या विविध भागात निर्माण झाला आहे. मित्रत्वाचे नाते ते अधिक चांगल्या प्रकारे जपत असतात. त्यापैकीच एक जिवलग मित्र असलेले,आष्टीतील अमृतराजे आजबे आणि त्यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे मैत्री संबंध आहेत.अमृतराजे आजबे यांचे देखील महावितरणच्या प्रशासकीय जबाबदारी सोबत, विविध सामाजिक कार्यातील भरीव योगदान आहे.समाजातील गरजूंना अडचणीच्या काळात मदतीला धावून जाण्याचे काम नेहमी त्यांच्या माध्यमातून होत असत. त्यामुळे अशा दोन समाज प्रेमी मित्राच्या सदिच्छा भेटीने त्यांच्यातील आनंद अधिक द्विगुणित झाला आहे.
यावेळी त्यांनी शिवराज एंटरप्राइजेसचे मालक मा.शिवराज अमृतराजे आजबे, यांना सौर ऊर्जा ही काळाची गरज लक्षात घेता, निवडलेल्या सोलर व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पत्रकार मा.शरद रेडेकर,वाघोली मांजरीचे युवा उद्योजक मा.राहुल शेठ उंदरे, टायगर रजनीश मेजर (पुणे),युवाउद्योजक प्रदीप सातव (पुणे), युवाउद्योजक रामभाऊ आव्हाळे (पुणे ), मा.अमृतराजे आजबे, युवा उद्योजक मा.तुषार काळे सर,युवा उद्योजक मा.अशोक शेठ भोसले,अध्यक्ष मा.प्रशांत दादा पोकळे,मा.चेतनशेठ मुळे,मा.जयदीप आजबे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
stay connected