*चेस मास्टर साहिल गोरघाटे यांना इंटरनॅशनल स्पर्धेत सुवर्ण पदक सह एक लाख रुपयांचा नगद पुरस्कार*
* - देशातील सर्वात प्रतिष्ठित इंटरनॅशनल लेवल चेस चॅम्पियनशिप मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील एक सामान्य राष्ट्रीय खेळाळू व जिल्ह्यातील *सुप्रसिद्ध चेस कोच मास्टर साहिल गोरघाटे* यांनी यांनी *खुल्या गटात C ग्रुप मध्ये प्रथम क्रमांक पटकावला व तब्बल एक लाख रुपयांचा नगद पुरस्कार प्राप्त* केलेला आहे.
नुकत्याच भुवनेश्वर, ओडिसा येथे दिनांक 13 ते 16 मे 2025 दरम्यान संपन्न झालेल्या या *16 KIIT इंटरनॅशनल चेस स्पर्धा* मधे एकुण 24 देशातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रसिद्ध गौरव प्राप्त एकुण 550 चेस प्लेअर्स यांनी सहभाग नोंदविला होता.
*मास्टर साहिल गोरघाटे* यांच्या या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राप्त दमदार कामगिरी व सुयशा करीता त्यांचे पालक श्री विशाल गोरघाटे, श्री चंदन सिंग चंदेल (माजी अध्यक्ष -FDCM, बल्लारपूर), अँड. रणंजय सिंग (बल्लारपूर),जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अविनाश पुंड, क्रीडा अधिकारी सौ जयश्री देवकर, श्री मनोज पंधराम,श्री नंदु आवारे, श्री मोरेश्वर गायकवाड, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री विजय ढोबाळे, श्री संदीप युइके, चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर चेस असोसिएशन चे अध्यक्ष श्री पांडुरंग आंबटकर, चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन चे सचिव व क्रीडा मार्गदर्शक दुर्गराज रामटेके(मार्शल आर्ट्स एक्सपर्ट), चेअरमन नीलेश गुंडावार, मार्गदर्शक श्री आशुतोष गायनेवार,चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर रोप स्कीप्पिंग असोसिएशन चे सचिव करण डोंगरे, चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर सिलिंबम असोसिएशन चे सचिव बी एल करमनकर, फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट चे स्विमिंग कोच राकेश राय , द असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स अँड फिटनेस ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट च्या सौ शीतल रामटेके,सौ शुभांगी डोंगरावर, सौ प्रगती कथडे , प्राविण्य पाथर्डे,श्री सतीश करमनकर,श्री पिंगळेश्वर हाडके, कैलास शुक्ला, अशोक कामडे,सुरेंद्र सिंग चंदेल, साहिल चहारे, संदीप पंधरे संजय माटे, गौतम भगत, शंभु वाघमारे,सतीश शेळके व *जिल्ह्यातील सर्व क्रिडा क्षेत्रातील मान्यवर क्रीडा प्रेमी व मार्गदर्शक, कोचेस, आणि प्लेअर्स यांच्या द्वारा सर्वत्र मास्टर साहिल गोरघाटे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
stay connected