पाकिस्तान सारख्या भिकारी राष्ट्राने भारत देशाशी लढण्याचे स्वप्न बघू नये...- आ.सुरेश धस भव्य शौर्य तिरंगा यात्रेने..आष्टीकरांचे वेधले लक्ष

 पाकिस्तान सारख्या भिकारी राष्ट्राने भारत देशाशी लढण्याचे स्वप्न बघू नये...- आ.सुरेश धस
भव्य शौर्य तिरंगा यात्रेने..आष्टीकरांचे वेधले लक्ष..






आष्टी  (प्रतिनिधी) पाकिस्तान आतंकी स्थान झाला आहे.. पाकिस्तानचे सैन्यदल हतबल झाले आहे मोठ्या मोठ्या वल्गना करणारे.." अगर पाणी बंद कर देंगे तो खून की नदिया बहेंगी "  म्हणणारे पाकिस्तान मंत्रिमंडळ बंकर मध्ये लपून बसले..

 संपूर्ण जगासमोर पाकिस्तानची नाचक्की झाली आहे..

 पाकिस्तान सारख्या भिकारी राष्ट्राने भारताशी लढण्याचा विचार ही  करू नये..

" अब नरेंद्र मोदी का नया भारत है..

 देश मोदी जी के साथ है, और देश सेना के साथ है असे प्रतिपादन आ. सुरेश धस यांनी केले

 आष्टी येथे त्यांनी आयोजित केलेल्या..शौर्य तिरंगा यात्रेच्या समारोपप्रसंगी प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते.. यावेळी व्यासपीठावर श्रीमती भाकरे श्रीमती काकडे श्रीमती कमल सोंडगे श्रीमती रत्नमाला वाल्हेकर श्रीमती अरुणा नागरगोजे श्रीमती भाग्यश्री राख श्रीमती सीताबाई राख श्रीमती सीताबाई गायकवाड श्रीमती तावरे या केवळ वीर पत्नी वीरमाता यांची उपस्थिती होती प्रमुख पदाधिकारी व देशप्रेमी नागरीक प्रचंड संख्येने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस  माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी श्री.अंकुश खोटे यांनी स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची.." ये भारत कोई भूमिका टुकडा नही, ये वंदन की धरती है अभिनंदन की भूमी है.. ही कविता ऐकवली..सेवानिवृत्त मेजर श्री.भोसले यांनी प्रास्ताविक केले.. या संपूर्ण शौर्य तिरंगा यात्रेचे सूत्रसंचालन सूत्र बाळासाहेब तळेकर यांनी केले..

पुढे बोलताना  आ.सुरेश धस म्हणाले, २२ एप्रिल रोजी काश्मीर मधील पहलगाम परिसरातील बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटनाला गेलेल्या भारतीय नागरिकांना विशेषतः पुरुषांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालून मारण्यात आले..

 कुटुंबीयां देखत, पत्नी समोर ,मुलाबाळांवर समोर..विशेषतः केवळ पुरुषांना क्रूर पद्धतीने गोळ्या घालून मारण्यात आले ही अत्यंत अमानवी कृती होती त्यामुळे या पाकिस्तान पुरस्कृत  आतंकवाद्यांना आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अत्यंत विचारपूर्वक योजना आखून पाकिस्तानला धडा शिकवला आहे दि.६ मे च्या रात्री 

अगोदर पहिल्या दिवशी शंभर ते दीडशे दहशतवाद्यांना कंठस्नान घालून दुसऱ्या दिवशी दि.७ मे रोजी केवळ २३  मिनिटांमध्ये पाकिस्तानातील प्रमुख नऊ हवाई तळ उध्वस्त करून भारतीय सैन्याने पराक्रमाची गाथा लिहिली आहे..अफगाणिस्तान,अरब  अमिराती, या मुस्लिम राष्ट्रांनी आणि दोन तीन देश वगळता..

संपूर्ण जगाने भारताला पाठिंबा दिला आहे.. पाकिस्तानला केवळ तुर्की आणि अझरबैझान या भिकारी राष्ट्रांनी पाठिंबा दिला आहे..

 भारतावर यापूर्वी दहशतवादी हल्ले झाले ..२६/११ हा भारत देशावरील हल्ला होता,  मुंबई शहरात बॉम्ब स्फोट झाले शेकडो नागरिक मारले गेले.. परंतु तात्कालीन भारतीय  पंतप्रधानांकडून केवळ निषेध व्यक्त झाला.. पाकिस्तानला चोख उत्तर देण्यात आले नव्हते..

 परंतु आता भारत बदललेला आहे 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलाला सूट दिलेली आहे मोकळीक दिलेली आहे काही दिवसांपूर्वी याच तुर्कस्तानमध्ये भूकंप झाला असता त्यावेळी त्यांना वैद्यकीय मदत देणारा पंतप्रधान मोदींचा भारत देश हाच सर्वात पुढे होता मात्र तुर्की देशाने या मदतीची उपकाराची  परतफेड अपकाराने केली असून पाकिस्तानला मदत  केली आहे

 पाकिस्तान कडे शस्त्र नाहीत शस्त्र घ्यायला पैसे नाहीत प्रचंड कर्जबाजारी असल्यामुळे आज पाकिस्तानात महागाईने कहर केला असून जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत पाकिस्तानचे सैन्यदल देखील सैन्यदल राहिले नसून ते अतिरेकी झाले आहेत सैन्यदल आणि अतिरेकी यांच्यात काहीही बदल राहिलेला नाही ...असे सांगत भारतीय जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही शौर्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे आणि यामध्ये मतदारसंघातील हुतात्मा झालेल्या वीर सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे असे सांगितले या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले त्रिदल माजी सैनिक संघटना, नागरिक, व्यापारी, विद्यार्थी विद्यार्थिनी ,यांचे त्यांनी मनापासून आभार मानले आष्टीच्या पंचायत समिती येथील हुतात्मा स्मारकापासून हुतात्मा जवानांच्या वीर पत्नी वीर माता यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारत मातीची प्रतिमा असलेला अश्वारूढ रथ लक्ष आकर्षण घेत होता बँड पथकाच्या निनादात देशभक्तीच्या 

" नया भारत का जलवा देखा, पाकिस्तान ने मलबा देखा,"

" हिंद की सेना ने भरी हुंकार..

 पाकिस्तान मे मचा हाहा:कार.."

" घर मे घुसकर मारा है, आतंक का भूत उतारा है, जो हिंदुस्तान से टकरायेगा,चूर चूर हो जायेगा... 

घर मे घुसकर मारा है, आतंक का भूत उतारा है.. जो हिंदुस्थानको टकरायेगा.. चुरचुर हो जाएगा,

 सिंदूर का हिसाब चुकाया है, पाकिस्तान को सबक सिखाया है, अशा राष्ट्रभक्तीपर देशप्रेमाने भारलेल्या घोषणांनी आष्टी नगरी दुमदुमून गेली होती.. यावेळी हजारो नागरिक या शौर्य तिरंगा यात्रेत सामील झाले असल्याने संपूर्ण आष्टी शहरातील नागरिकांचे या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले..

ही संपूर्ण शौर्य तिरंगा यात्रा यशस्वी करण्यासाठी आ.सुरेश धस मित्र मंडळ,त्रिदल सैनिक संघटना,आजी माजी सैनिक यांनी खूप मोठे परिश्रम घेतल्याने ही शौर्य तिरंगा यात्रा यशस्वी झाली. तर या भव्य दिव्य तिरंगा यात्रेत प्रमुख पदाधिकारी, आजी माजी सैनिक यांच्यासह देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




आ.सुरेश धस यांनी हातात तिरंगा ध्वज घेत दिल्या घोषणा


आष्टी शहरातील भव्य दिव्य तिरंगा यात्रेत हजारो देश प्रेमी आपल्या हातात तिरंगा ध्वजा घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झाले होते तर या रॅलीत आमदार सुरेश धस यांनी देखील तिरंगा ध्वजा हातात घेऊन "भारतीय सैन्य दलाचा विजय असो""भारत माता की जय""पाकिस्तान मुर्दाबाद" अशा घोषणा देत स्वतः सहभागी होत देशाच्या सीमेवर सेवा करणाऱ्या सैनिकांचे व रॅलीत सहभागी देशप्रेमीचे मनोबल वाढवले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.