इयत्ता अकरावीसाठी यंदा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
तेजवार्ता न्यूज नेटवर्क चे संपादक सय्यद बबलूभाई यांचा वाढदिवस जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा येथे साजरा करण्यात आला त्यांना वाढदिवसाच्या व पुढील आयुष्याच्या उदंड शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी उपस्थित यामध्ये कॉलेज प्राचार्य श्री सय्यद सर उपप्राचार्य कर्डिले सर केंद्रप्रमुख श्री जावेद पठाण सर व सर्व प्राध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी त्यांनी अकरावी ऑनलाइन प्रवेश कसा करायचा याबद्दल माहिती दिली त्यासाठीच्या वेबसाईट ची माहिती दिली . दिनांक 19 मे 2025 ते 28 मे 2025 या कालावधीत विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे .
धानोरा परिसरातील शाळा प्रमुखांनी आपापल्या विद्यार्थ्यांना अकरावी च्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्याचे कळविण्यासाठी पालकांना व विद्यार्थ्यांना आवाहन करण्याचे केंद्रप्रमुख श्री पठाण साहेब यांनी सांगितले धानोरा हिवरा सुलेमान देवळा गहुखेल सावरगाव गंगादेवी कारखेल अरणविहीरा मराठवाडी देऊळगाव घाट दौलावडगाव पिंपळगाव घाट लोणी खुंटेफळ वाघळुज पिंपळा सालेवडगाव निमगाव बोडखा मेहेकरी हातोळण या सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना आवाहन करावे जेणेकरून अकरावी प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही . असे नोडल अधिकारी पठाण साहेब यांनी सांगीतले .
stay connected