27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर

 *27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*



घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर.

घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.

    पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.



    होय! अशीच एक मनोरुग्ण...

मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली.

Mlc मनोरुग्ण म्हणून तिच्यावर उपचार सुरू झाले. मनोरुग्णालयातील ह्या 27 वर्षांच्या वास्तव्यादरम्यान मुसम्मा फक्त लहान मुलासारखी बोलायची दर वेळेस दर 3 महिन्यांनी माननीय कोर्ट कमिटी समोर सातत्याने तिला चर्चेसाठी उपस्थित करावे लागायचे परंतु प्रत्येक वेळेस मुसम्मा ह्या रुग्णाने स्वतः बदल  काहीही माहीती दिली नाही.  बंगाली दुभाषी आणून त्यांच्याशी तिचे बोलणे करून दिले परंतु त्या काहीही माहीती देत नव्हत्या सातत्याने लहान मुलासारखे हसणे आलेल्या प्रत्येक व्यक्तिच्या पाया पडणे हे त्यांना फार आवडायचे.अगदी दोन ते तीन व्यक्तींना एखादा पदार्थ वाढल्याशिवाय त्या काहीही खात नव्हत्या असा त्यांचा दिनक्रम असे.

प्रत्येक वेळेस त्यांचा  संवाद लहान मुलासारखा असायचा त्यामुळे माननीय न्यायालय कमिटीच्या पात्रता फेरीतून त्यांना unfit for discharge व unfit फॉर ट्रायल असाच कमिटीचा शेरा मिळायचा.



रुग्णालय प्रशासनाने सलग 7 वर्षे वरील मुसम्मा चा stay असल्यामुळे सतत 2010 पासून पत्रव्यवहार करून शासनाला तिच्यावरील गुन्ह्याचे कलम काढून तीला साधारण रुग्ण घोषित करावेत असा पाठपुरावा घेतला.सततच्या प्रयत्नांना यश आले...न्यायालयीन आदेशान्वये मुसम्मा या सिव्हील  रुग्ण म्हणून घोषित  झाल्या जणू अर्धी लढाई जिंकली होती आणि अर्धी बाकी होती पण त्यासाठी देखील लवकरच प्रयत्न सुरू झाले.

      समाजसेवा अधीक्षक   श्रीमती रंजना दोनोडे , मानसोपचारतज्ज्ञ डॉ.अमोल भुसारे, व मानसोपचार सिस्टर श्रीमती सोनाली पंडित डॉ श्वेता राठोड,कक्ष परिसेविका श्रीमती वर्षा फटकाळे वराडे अधिपरिचरिका देशमाने,तटकरे,कुंभार,पाटील  तसेच इंटर्न स्टुडंट आणि बंगाली भाषा बोलणाऱ्या psychology student आभाग्या दास यांच्यासोबत मनोरुग्ण मुसम्मा  सतत संवाद साधत होती आणि लहान मुलांसारखी उत्तरे देत होती.हळू हळू तिने तिचे शाहपुर गाव आसाम सांगितले  शाहपुर हे 3 गाव वेगवेगळ्या ठिकाणी जसे नल्बारी कोकराझार अमीनकाटा  आसाम असे गूगल वर आढळले. सातत्याने याचा पाठपुरावा घेतला गेला. तसेच बर्‍याच वेळा  स्टुडंट अभाग्या दास व मुसम्मा यांचे बंगाली भाषेत संवाद साधले गेले. अनेकवेळा माहिती विचारली की, कधी तुटक शब्दात बंधू डॉक्टर आहेत  अशी माहिती मिळायची. मुसम्मा च्या हक्काच्या घराचा शोध सुरू झाला. कोकराझार पोलिस हेड कंट्रोल sp office संपर्कप्रमुख  कोकराझार  पोलिस मोबाईल नंबर 6026900824  watsapp वर मुसम्माचे फोटो व सर्व माहिती दिली मुसम्माचे ड्यूटी वर कार्यरत असणाऱ्या पोलिसांसोबत बोलणे करून दिले परंतु फोन वर ती नुसतीच लहान मुलासारखी हसत होती तिने पोलिसाना काहीच उत्तर दिले नाही पुन्हा दुसरा प्रयत्न असामी बेलसॉर पोलिस इंस्पेक्टर श्री नीलमनी नाथ याना तिचे फोटो व डिटेल्स शेअर केले .त्याच्या अधिपत्याखाली रुग्ण सांगत असलेले शाहपुर गाव येत होते परंतु 27 वर्षापासुन बेपत्ता असलेल्या तसेच हुबेहूब वर्णन असलेल्या अशा मुसम्मा नावाने किंवा ईतर मुस्लीम महिले बाबत खात्रीची माहिती भेटली नाही.त्यानंतर श्रद्धा टीमची यासाठी मदत घेतली त्यांचे नेटवर्क खूप विस्तृत आहे त्यांच्या मदतीने ती सांगत असलेले संदर्भ श्रद्धा टीमला मिळाले व श्री वाटवाणी सर  श्रद्धा रिहॅब टीम यांनी मेल पाठवले. तिच्या नातेवाईकांना तिच्याविषयी समजताच त्यांचे आनंदाश्रु वाहू लागले एवढ्या वर्षांनी कधी तिला मन भरून पाहू असे त्यांना झाले होते. तिला आसाम मधील नातेवाईकाच्या ओळखपरेड करिता श्रद्धा रिहॅब येथे पाठवावे असे ठरले  त्यानुसार मनोरुग्ण मुसम्मा  जी शाहीन बेगम या नावाने ट्रेस झाली ती आज दिनांक 29 एप्रिल 2025 ला श्रद्धा रिहॅब होम यांच्या सुपूर्त करण्यात आली आहे. ह्या सर्व कामामध्ये मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक सर DS आळसपूरकर मॅडम तसेच प्रभारी मेट्रन कांबळे, असिस्टंट मेट्रन मोरे,संख्ये यांचे मार्गदर्शन लाभले.


*शब्दांकन*

*सौ वर्षा फटकाळे वराडे*

*परिसेविका प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे*

मोबाईल नंबर 8149172767

Email id varshafatakalewarade@gmail.com



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.