आ.सुरेश धस यांच्या पुढाकाराने शहादेव नरवडे यांच्यावर मुंबई येथे शस्त्रक्रिया !

 आ.सुरेश धस यांच्या पुढाकाराने शहादेव नरवडे यांच्यावर मुंबई येथे शस्त्रक्रिया !

**********************************

6 लक्ष रुपयांपर्यतची मोफत शस्त्रक्रिया; नरवडे कुटुंबियांनी मानले आ.धसांचे आभार..



**********************************

आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी मतदारसंघाचे लोकनेते आमदार सुरेश धस यांची मतदार संघामध्ये निरंतर रुग्णसेवा सुरू असून त्यांनी आत्तापर्यंत शिक्षण, आरोग्य, महिलांचे प्रश्न अशा विविध प्रश्नांवर त्यांनी चांगले काम केलं आहे. ते सातत्याने नाविन्यपूर्ण काम करण्यात अग्रेसर असतात. असेच त्यांच्याकडे आरोग्याचा विषय घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला ते नेहमी सहकार्यची भावना मनात ठेवत मदतीचा हात दिला आहे.

      आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील  शहादेव नरवडे यांची गेल्या अनेक दिवसांपासून गुडघ्याचा जॉईंटाचा त्रास होत असल्याकारणाने त्यांनी दोन ते तीन वेळा मुंबई व पुणे येथे ऑपरेशन केले परंतु त्यावरही त्यांचा त्रास कमी झाला नाही. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिल्याने या ऑपरेशनसाठी पाच ते सहा लक्ष इतका खर्च खाजगी रुग्णालयांमध्ये येत होता तेव्हा त्यांनी  आ.सुरेश धस  यांची भेट घेत आपल्या वेदना सांगताच तात्काळ आमदार सुरेश धस यांनी या रुग्णाची मदत करण्याच्या हेतूने मुंबई येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये विविध ट्रस्ट व मुख्यमंत्री सहायता निधीसह धर्मादाय यांच्याशी संपर्क करत विविध माध्यमातून मोफत शास्त्रक्रिया यशस्वीपणे केली.आ.सुरेश धस हे रुग्णांचा ईलाज करण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णसेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असतात, ज्या गरिबांजवळ असाध्य रोगांवर उपचार करवून घेण्यासाठी पैसा नाही, ज्यांना मरणाशिवाय पर्याय नाही अशा रुग्णांना मदतीचा हात देण्याची भावना मनात असल्याने मतदार संघातील ग्रामीण भागांत राहणाऱ्या गरीब व कोणीही वाली नसलेल्या रुग्णांना स्वास्थ्य सुविधा पुरवविण्याचे काम करीत आहे.

याच हुतात भावनेने शहादेव नरवडे यांना  6 लाख रुपयांची मोफत शस्त्रक्रिया मुंबई येथील रुग्णालयात आ.सुरेश धस यांच्या माध्यमातून यशस्वी करण्यात आली.

शस्त्रक्रियेनंतर नरोडे हे ठणठणीत बरे झाले असून आमदार सुरेश धस यांच्या या जागरूक पणामुळे फार मोठा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे नरवडे परिवाराने आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.