*ह.भ.प. गुरुवर्य प्रज्ञाचक्षु मुकुंदकाका जाटदेवळेकर यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा संपन्न*
जाटदेवळे- (डॉ. उध्दव घोशीर)-
श्री संत ज्ञानेश्वर माऊली सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळा, श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज त्रीशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठगमन सोहळा व ह.भ.प. गुरुवर्य प्रज्ञाचक्षु मुकुंदकाका जाटदेवळेकर यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा अशा त्रिसंगमाच्या निमित्ताने हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा यांचे नियोजन जाटदेवळेकर यांनी ह.भ. प. गोविंद महाराज जाटदेवळेकर यांच्या मार्गदर्शनाने आयोजित केले.
ज्या गावाचे नाव संपूर्ण महाराष्ट्र भरच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी पोहचविले असे सर्वांचे आदरणीय जाटदेवळे भूषण प.पूज्य. गुरुवर्य प्रज्ञाचक्षु मुकुंदकाका जाटदेवळेकर. या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातील दिग्गज कीर्तनकार , प्रवचनकार व कथाकार यांनी गेल्या ७ दिवस समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे. यामध्ये शेवटच्या दिवशी ह.भ. प. गुरुवर्य मुकुंदकाका जाटदेवळेकर ह.भ. प.चंद्रशेखर महाराज देगलूरकर (आळंदी देवाची), ह.भ.प. दिनकर महाराज (वरुर), ह.भ.प.राम महाराज झिंजूर्के (आखेगाव) आणि ह.भ. प. गोविंद महाराज जाटदेवळेकर यांची भव्य अशी टाळ-मृदंगाच्या गजरात शोभायात्रा काढली. ह. भ. प. देगलूरकर महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
प. पूज्य काकांचा हा आपल्याच जन्मभूमी मध्ये होणारा अतीशय असा भव्य व आनंददायी कार्यक्रम ठरला गेला. सर्वांचे मिळालेले प्रेम आणि जिव्हाळा याने मी धन्य झालो. काकांनी व्यासपीठावरून आपल्या संपूर्ण जीवनातील अध्यात्माचा प्रवासही स्पष्ट करत सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील प्रत्येकाने तन, मन धनाने मेहनत घेतली. विशेषतः गावातील तरुण वर्गाने उचललेला भार, त्यांचे नियोजन, समर्पण आणि सेवाभाव खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.
या सात दिवसांच्या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रसारण करून काका वरती प्रेम करणारी जी व्यक्ती आहेत त्यांना ही याचा आनंद घरबसल्या द्विगुणित करता आला, ही एक अभिनव व काळाची गरज ओळखून घेतलेली स्तुत्य बाब होती. या कार्यक्रमांमध्ये समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्तांनी अन्नधान्याच्या आणि देणगीच्या स्वरूपात ही मदत केली गेली.
stay connected