लेखिका,कवयित्री सौ.प्रतिमा काळे लिखित "कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर" या पुस्तकाचे प्रकाशन.

 लेखिका,कवयित्री सौ.प्रतिमा काळे लिखित  "कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर" या पुस्तकाचे प्रकाशन.



पुणे:-ऑटो क्लस्टर सभागृह, चिंचवड,पुणे, येथे मंगळवार दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित तेहतिसाव्या श्रमउद्योग परिषदेत विविध पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रमात प्रा.डॉ.राजा दीक्षित,मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.तसेच ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस यांनी परिषदेचे उद्घाटन केले.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह डॉ. सुनीताराजे पवार अध्यक्षस्थानी होत्या;तसेच नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, पुरुषोत्तम सदाफुले प्रमुख उपस्थित होते.याप्रसंगी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,मुंबईचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांना 'पद्मश्री नारायण सुर्वे जीवनसाधना सन्मान' देवून सन्मानित करण्यात आले.'मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे सन्मान' कविवर्य माधव पवार यांच्या सहधर्मचारिणी चारुलता माधव पवार यांना प्रदान करण्यात आला.कष्टकरी महासंघ या संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांना 'नारायण मेघाजी लोखंडे स्मृती कष्टकरी हितसंवर्धन संघटना पुरस्कार'; माणिकराव ढोकले यांना 'यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र उद्योगभूषण पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले.पुरुषोत्तम सदाफुले मामांनी पुरस्कार निवडीबाबत भूमिका मांडली.पुरस्कार विजेत्या पैकी काही विजेत्यांची प्रकट मुलाखत घेतली.डॉ. सुनीताराजे पवार यांनी 'जगातील सर्वोत्तम गोष्टी कामगारांच्या कष्टांतून निर्माण झालेल्या आहेत.अर्धे जग महिलांनी व्यापले असून विषमतेची दरी कमी करून त्यांचा मान राखला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली.बाजीराव सातपुते यांनी 'एकटाच आलो नाही,युगाचीही साथ आहे' या व्याख्यानातून नारायण मेघाजी लोखंडे आणि नारायण सुर्वे यांचा जीवनपट मांडला.या भव्यदिव्य सोहळ्यात सर्व मान्यवरांच्या हस्ते त्रिशताब्दी जन्मोत्सव निमित्त,सर्व लहान मोठ्या वयाच्या विद्यार्थ्यांसाठी,संपूर्ण मानवांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्राची ओळख व्हावी यासाठी सौ.प्रतिमा काळे लिखित "कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर" या पुस्तकाचे प्रकाशन झाले.यातून सर्व सामान्य जनतेपर्यंत अहिल्यादेवींच्या कार्याची बहुमोल माहिती पोहचेल.किती तरी दुःख भोगले तरी निराश न होता,जनतेच्या भविष्यासाठी अहोरात्र त्या लढा देत राहिल्या,आपल्या सासऱ्यांना दिलेल्या शब्दाचे प्रामाणिकपणे पालन केले.या हेतूने निर्मिलेल्या पुस्तकाचे कार्यक्रमा दरम्यान प्रकाशन करण्यात आले.सर्वांच्या घरी या पुस्तकाचे पारायणे व्हावीत,जेणे करून पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जे जे कार्य केले त्याची ओळख या निमित्ताने होईल.प्रत्येक घरी हे पुस्तक पोहचले पाहिजे,असा मानस लेखिका,कवयित्री सौ.प्रतिमा काळे यांचा आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.