युट्युबरांना धमकी देणं थांबवा! - दिपकभाई केदार

 युट्युबरांना धमकी देणं थांबवा! - दिपकभाई केदार



राज्य सरकारमधील पंकजाताई मुंडे यांनी स्टोरी बनवणाऱ्या युट्युब चॅनेल्सवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. पण युट्युबर हा स्वतंत्र आहे, कोणाच्याही मालकीचा नाही! पत्रकार विकत घेता येतात, त्यांचे मालक विकत घेता येतात, पण युट्युबर विकत घेता येत नाहीत. आज सोशल मीडिया आणि युट्युब हे शोषितांचा आवाज बुलंद करणारी सर्वात मोठी ताकद आहे.


युट्युबर पुराव्याशिवाय, वास्तवाशिवाय स्टोरी बनवत नाहीत. जे मुख्य प्रवाहातील मीडियाला दाखवणं कठीण आहे, ते युट्युबर उघड करतात. त्यांचा आवाज आता दखलपात्र झाला आहे. त्यांचे करोडो फॉलोअर्स हा त्यांच्यावरील विश्वास दर्शवतो. राजकारण्यांनी स्वतःमध्ये बदल घडवावा, म्हणजे आपोआप चांगल्या स्टोरी येतील. काहीही वागायचं, गैरप्रकार करायचे आणि मग चांगल्या स्टोरीची अपेक्षा करायची? हे चुकीचं आहे!


युट्युबरांनी बिनधास्तपणे वास्तवावर आधारित स्टोरी बनवाव्यात. ऑल इंडिया पँथर सेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. धमकी देणाऱ्यांनी आणि कायद्याची मागणी करणाऱ्यांनी आधी स्वतः नीट वागावं, हाच त्यांचा एकमेव पर्याय आहे.



पत्रकारितेत आरक्षण नाही, शोषितांचा आवाज मीडियात दाबला जातो. अशा वेळी बेरोजगार तरुण-तरुणींनी युट्युबच्या माध्यमातून स्वतंत्र पत्रकारिता स्वीकारली. त्यांनी स्वाभिमानी पत्रकारितेचा नवा मार्ग शोधला. गाव, जिल्हा, राज्य आणि देशभर त्यांचा आवाज घुमतोय.


सरकारने त्यांची दखल घेऊन या आधुनिक व्यवसायाला प्रोत्साहन द्यावं, त्यांना मदत करावी. त्यांना धमकावणं किंवा हिटलरशाही दाखवणं चुकीचं आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो आणि युट्युबरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत! असे दिपकभाई केदार म्हणाले .




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.