*पाडळी गावची भीमजयंती म्हणजे भीमविचाराचा पारंपारिक वारसा होय- डॉ जितीन वंजारे*
*प्रा.अशोक मुंढे यांच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील व्याख्यानाणे पाडळी नगरी तृप्त*
बीड प्रतिनिधी:- मौजे पाडळी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथील साला-बादाप्रमाणे यावर्षीची तीस तारखेची भीम जयंती साठी उपस्थित राहता आलं. भीम जयंती म्हटलं की भीम सैनिकांचा जणू सन उत्सव होय, सर्वजण एकत्र येतात घरात गोड अन्न पदार्थ केले जातात पाहुणे बोलावून अन्नदान केले जाते, गावात बाबासाहेबांची प्रतिमा रथातुन मिरवली जाते, सर्व भीमसैनिक जयंतीची जोमाने तयारी करतात अशीच एक पारंपारिक प्रत्येक वर्षी भीमजयंती साजरी करणार शिरूर तालुक्यातील पाडळी हे गाव प्रसिद्ध आहे. ह्या गावात 30 एप्रिल ला जयंती साजरी केली जाते, सर्वजण एकत्र येऊन यावर्षी खूप सुंदर असं भीम जयंतीच्या नियोजन कमिटी ने केल होत.गावातून बाबासाहेबाना रथातून डीजे मिरवणूक करून नंतर बुद्ध विहारासमोर विचारांची शिदोरी देण्यासाठी अनेक मान्यवर उपास्थित होते या कार्यक्रमाला मुख्य वक्ते म्हणून प्रा अशोक मुंढे हे होते ते एक लेखक, प्राध्यापक, निवेदक आणि व्याख्याते आहेत त्यांच्या अभ्यासमय वाणीतून बाबासाहेब आंबेडकर ऐकायला आनंद वाटला, खूप काबाड कष्ट घेऊन हाल अपेष्टा सहन करून बाबासाहेबानी दलित शोषित पीडितासाठी मोठ काम उभारलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे विद्येच विद्यापीठ आहेत, समता, स्वातंत्र्य, भाईचारा बंधुत्व, समानता, एकता आणि अस्पर्शता निर्मूलन साठी काम करणारे हे एकमेव महामानव आहे असे उद्गार प्रा मुंढे यांनी काढले,यावेळी भीम सैनिकांना संबोधन करताना दलित नेते तथा सामाजिक कार्यकर्ते मा सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी बाबासाहेबांचे विचार सांगून आचरणात आणायचे आव्हाहन यावेळी केले, शिक्षण हेच एकमेव शस्र आहे जे मनुवादी व्यवस्थेची चिरफाड करू शकत असं ठणकावून सांगितलं. बाबासाहेबांची जयंती अक्ख्या जगात साजरी होते त्याच कारण हा महामानव प्रत्येक क्षेत्रात एक नंबरचा विद्वान माणूस होता. आणि म्हणून इथे फक्त ज्ञानवंताचा गौरव होत हेच ह्यातून सांगितलं. यावेळी पाडळी गावाचे सरपंच पाखरे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सर्वव्यापी बाबासाहेब आंबेडकर सांगितले. असा विद्वान जे कधीच ज्ञानाची लढाई हरला नाही असे उद्गार यावेळी काढले सरपंच पाखरे यांनी काढले. यावेळी इंजिनियर प्रवीण सरवदे म्हणाले बाबासाहेबांची लोकशाही सर्व देशांना मान्य आहे,किम जोंग उत्तर कोरियाचा हुकूमशाह सुद्धा डॉ बाबासाहेबांची जयंती मोठा थाटात साजरी करतो कारण बाबासाहेबांचे विचार हे मानवतेला पूरक आहेत.बाबासाहेबांच्या समता बंधुता, स्वातंत्र्य, सर्वभौम, न्याय सर्व मूल्य महत्वाची आहेत हेच जगाला सांगितलं
प्रा मुंडे सर यांचं जोरदार व्याख्यान झाले आनी त्यांच बाबासाहेबांविषयी च ज्ञान खरोखरं घेण्याजोग होत खूप छान मांडणी त्यांनी केली,यावेळी त्याकाळची सामाजिक, राजकीय आणि धार्मिक स्थिती त्यांनी मांडली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाडळी गावचे सरपंच सन्माननीय गहीनाथ जिजा पाखरे,प्रमुख वक्ते प्राचार्य ए.आर. मुंडे सर व प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते तथा दलित चळवळी चे नेते डॉ. जितिनदादा वंजारे खालापूरीकर,इंजिनियर प्रवीण सरवदे, मंगेश सरवदे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उमेश सरवदे, कालिदास सरवदे, गंगाधर सरवदे, सोसायटी चेअरमन भगवान पाखरे, इब्राहिम भाई, कातकडे सर, आदी होते.यावेळी जयंतीचा समिती कमिटी शरद सरवदे, विशाल सरवदे, ऋषी राऊत, शुभम सरवदे, पवन कांबळे, समाधान सरवदे, साईनाथ सरवदे,प्रशांत कुलते, लहू वंजारे,योगेश दुधाळ यांच्यासह अनेक ग्रामस्थ महिला अबाल वृद्ध आणि युवा मित्र मंडळ उपस्थित होते.
stay connected