*एकवीस वर्षानंतर आदर्श विद्यालय खालापूरी शाळेच्या 2003-4 च्या बॅच च स्नेह संमेलन*
बीड प्रतिनिधी :- खालापूरी येथील आदर्श विद्यालयातील सण 2003-04 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हॉटेल गोल्डन चॉईस येथे स्नेह संमेलन पार पाडले. मैत्री आणि तीपण बाल पणाची निस्वार्थ मैत्री आणि त्यात तब्बल एकवीस वर्षांनी भेट हा योग जवळजवळ सर्वांनी अनुभवला आजकाल सर्वजण करत असलेली गेट टुगेदर ची परंपरा याही विद्यार्थ्यांनी पार पाडली यावेळी जवळजवळ पस्तीस विद्यार्थी विध्यार्थिनी उपस्थित होत्या यावेळी सर्वांनी मनोगत व्यक्त केले सर्वांनी एकत्र गप्पा मारल्या आणि सोबत स्नेहभोजन करून कार्यक्रम पार पडला. खूप दिवसानंतर विखरलेली ही पाखर एकवीस वर्षांनी एकत्र आल्यावर सगळ्यांना भावनावश अनुभव प्राप्त झाला. एक अवस्मरनीय भेट आणि त्या भेटीचा क्षण प्रत्येकाने मोबाईल मध्ये कैद केला एकमेकांना शेअर केला आणि अगदी आंनदमय वातावरनात विदयार्थी स्नेहसंमेलन पार पडलं.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बापू परजने, भारत ठोसर,आदम शेख,किशोर उगले, चंदू खरपाडे,पल्लवी पानगे,श्रीकांत तुरुकमारे यांनी विशेष मेहनत घेतली.यावेळी गेट टुगेदर या कार्यक्रमाला बापू परजणे,किशोर उगले, मिलन उगले, आजिनाथ उगले, अमोल भस्मारे, महादेव उगले, सतीश खरपडे, अरुण गात, सखाराम बनगे, नारायण आनंदकर, पोपट बनगे, धनंजय बनगे, रईस शेख, असलम पठाण, माऊली थिटे, श्रीकांत तुरुकमारे, विलास पवार, कैलास पवार, हनुमान गवळी, दत्ता परजणे, हरीभाऊ जाधव, विनोद जाधव, चंदू खरपाडे, निलेश परजणे, हनुमान परजणे, संतोष विटोरे, बाबासाहेब कापसे, गणेश यादव, भरत ठोसर, महेश देशमुख, आदम शेख, शरद नवले,राधा पवार, छाया लिहिणे, पल्लवी पानगे, मंजुश्री परजणे, सरिता काळे, मंदा डोके, मनीषा भस्मारे, मीरा परजणे, शीला लिहिणे इत्यादी सर्वजण उपस्थित होते.यावेळी एकमताने स्वर्गवाशी विठाबाई फावडे या वर्गमैत्रिणीला सर्वांनी मिस केल आणि तिच्या मुलीला उरलेली रक्कम देण्याचे ठरवलं. मैत्री काय करू शकते याच मोठा आदर्श यावेळी ह्या बॅच ने दिला दारू, मटण आणि डीजे वर नाचून पैसे खर्च करण्यापेक्षा आणि आपली भडास काढण्यापेक्षा व दोस्तीत कुस्ती करण्यापेक्षा उरलेली रक्कम वारलेल्या स्वर्गवाशी वर्गमैत्रिणीच्या अनाथ मुलीला दिली गेली हा आदर्श ह्या बॅच ने घालून दिला.स्नेहसंमेलन सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत होत, कार्यक्रमांच सूत्रसंचालन जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन बाप्पू परजने यांनी केले.यावेळी सर्वांनी पुन्हा भेटण्याची आणि असच स्नेह संमेलन करण्याची इच्छा व्यक्त केली.
stay connected