कामगार दिनाच्या दिवशी मजूरांच्या वाहनाचा अपघात : मजूरांवर कोसळला दुःखाचा डोंगर
Ashti (प्रतिनिधी) – धामणगाव कडून कडा येथे येत असलेल्या महिंद्रा पिकप या वाहणाचा अपघात होऊन तीन जण जागीच मृत्युमुखी पडले तर सुमारे 20 जण जखमी झाले आहेत धामणगाव येथून जवळच असलेल्या वंजारवाडी या गावातील मजूर धामणगाव मार्गे कडा येथे कांदा भरण्यासाठी येत असताना महेंद्र पिकप हे वाहन देवी निमगाव जवळ रस्त्याच्या खाली जाऊन धडकले यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर सुमारे 20 जन जखमी झाले आहेत जखमींना तात्काळ अहमदनगर येथे तर काही जखमींना कडा येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर पुढील उपचार चालू आहेत परिसरामध्ये शोक कळा पसरली आहे हि घटना आज दिनांक १ मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास कडा ते देवीनिमगाव रस्त्यावर सासू सुनेच्या माळाजवळ मजूर वाहतूक करणाऱ्या वाहनाचा टायर फुटून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत श्रावणी विक्रम महाजन (वय १४), ऋतुजा सतीश महाजन (वय १६), व अजित विठ्ठल महाजन (वय १४) या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर कडा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विडीओ वृत्त पहा👇📽️
घटनेचे वृत्त समजताच कड्याचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते अनिल तात्या ढोबळे, तसेच धामणगावचे माजी सरपंच संजय गाढवे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेच्या सहाय्याने रुग्णालयात दाखल केले. कडा, धामणगाव व देवीनिमगाव येथील ग्रामस्थांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले .
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
stay connected