निळा येथे शाॅक सर्किट मुळे ,कडब्याला लागली आग, कडब्याची गंजि जळुन खाक...
लोहा : - तालुक्यातील निळा येथील गंगाधर संभाजी मोरे यांच्या शेतातील कडब्याच्या गंजीला लागलेल्या आगीमध्ये कडबा पेंडी व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना दिनांक ०३/०५/२०२५ शुक्रवारी दुपारी तीन वाजता घडली आहे. निळा शिवारात गंगाधर संभाजी मोरे यांनी
जनावरांना खाण्यासाठी कडब्याची वळई करुन ठेवली होती. अचानक शाॅक सर्किट मुळे या कडब्याने पेट घेतला. वारा असल्याने आग वाढत गेली. आग लागल्याची माहिती समजताच गावकऱ्यांसह इतर नागरिक आग विझविण्यासाठी धावले. मात्र, कड्याच्या गंजिला लागलेली आग विझविणे शक्य झाले नाही. पाहता पाहता या आगीत सुमारे १ हजार कडबा पेंडी जळून खाक झाल्या.
ही आग कडब्याच्या जवळुन गेलेल्या विद्युत प्रवाहीत तारेच्या शाॅक सर्किट मुळे लागली . दरम्यान, आगीची माहिती मिळाल्यानंतर
गावातील नागरिकांनी घटनास्थळी येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आग विझवने शक्य झाले नाही
या आगित सदरील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
stay connected